सोनपेठ/प्रतिनिधी
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संकटात दिवसेंदिवस वाढ होत असून बँकेकडून नाकारले जाणारे पीककर्ज,सोयाबीन बियाण्यामुळे दुबार पेरणीचे ओढावलेले संकट,युरिया खताच्या तुटवड्यावर मार्ग काढणारा शेतकरी,अनेक प्रश्नाने आर्थिक अडचणीत असून शेतकऱ्यांचे सरकार म्हणवून घेणाऱ्या सरकारला शेतकऱ्याची कीव येत नसल्याचा सवाल उपस्थित करत भाजपाचे दूध दरवाढ व इतर प्रश्नावर आंदोलन नुकतेच संपन्न झाले.यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असणाऱ्या प्रमुख मागण्याचे निवेदन पाठवून शेतकऱ्यांच्या भावना निवेदनातून कळवण्यात आल्या.यावेळी शेतकऱ्यांचा कळवळा म्हणून घेणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांची कीव येत नसल्याने या सरकारची किव करण्याची वेळ आली असल्याचा घणाघात जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम यांनी केला.यावेळी महाराष्ट्रामध्ये एक कोटी ४० लाख लिटर गाईच्या दुधाचे उत्पादन होते.त्यापैकी ३५ लाख सहकारी संघाकडून खरेदी केल्या जाते तर ९०लाख लिटर दुध खाजगी संस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतल्या जाते,पंधरा लाख लिटर दूध शेतकरी स्वतः हॉटेल्स आणि ग्राहकांना पुरवतो शासकीय योजनेद्वारे फक्त एक लाख लिटर दुधाची खरेदी केल्या जाते या कोरोनाच्या लोकडॉनमुळे दुधाच्या विक्रीमध्ये ३०%घट झाली आहे.शहरातील मुख्य हॉटेल व्यवसायावर संक्रांत ओढावली आहे.या सर्वपार्श्वभूमीवर शेतकरी त्रस्त आहे.या संकटाचा सामना करत असताना मार्ग काढणे गरजेचे आहे.मात्र सरकार शेतकऱ्याची चेष्टा करत असल्याचा आरोप भाजपाचे शिवाजीराव मव्हाळे यांनी केला आहे.त्यामुळे शासनाला शेतकऱ्याची कीव यावी हा उद्देश या निवेदनाच्या माध्यमातून व्यक्त करत शासनाने गाईच्या दुधाला सरसगट दहा रुपये लिटरप्रमाणे अनुदान तर दूध पावडरच्या एक किलोला पन्नास रुपये अनुदान देण्याची मागणी या निवेदनाच्या माध्यमातून कदम व मव्हाळे यांनी संयुक्तरीत्या बोलतांना केली आहे.वरील मागण्या मान्य न झाल्यास एक ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.निवेदनावर प्रमोद वाकोडकर,रमेश गोळेगावकर,रामकिशन रौंदळे,बाळासाहेब भालेराव,संदीप जाधव,बाळासाहेब राजूरकर,भालचंद्र गोरे,राजेश देशमुख,सुरेश भुमरे यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
COMMENTS