धर्माबादच्या कोव्हिड सेंटरला ऐन्टिजेन किटची आवश्यकता  


 


धर्माबाद (अहमद लड्डा ) कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी येथील कोव्हिड सेंटरला ऐन्टिजेन किटची आत्यंत आवश्यक आसल्याची खंत माजी उपनगराध्यक्ष रमेशचंद्र तिवारी यांनी उपरोक्त प्रतिनिधीशी बोलतांना म्हणाले.


देशासह जगभरात कोरोनाच्या महामारीमुळे आनेकाचे जिव गेले आसून कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी आवश्यक आसल्यास घराच्या बाहेर पडावे आसे वारंवार सुचना दिल्या जात आहे. 


नादेड जिल्ह्यातील धर्माबाद शहर व तालुक्यातील कोरोनाचा शिरकाव झाला असून जुलै महिन्यात एका पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्याने शहरात कोरोनाचा शिरकाव झाला. कोरोनाची तपासणी साठि सध्या उशीरा रीपोर्ट येत आसून नांदेड हे १०० कि मी अंतरावर असल्याने जाणे येणे अवघड होत आहे उशीरा रीपोर्ट आल्याने कोरोना चा खतरा वाढत आहे. आशातच कोव्हिड सेंटरला ऐन्टिजेन किटची आवश्यकता आसून शासनाने याकडे गांभीर्याने विचार करावा आसे मत माजी उपनगराध्यक्ष रमेशचंद्र तिवारी यांनी व्यक्त केले.


टिप्पण्या