- भारिप बहुजन महासंघ / वंचित बहुजन आघाडी तालुका शाखा व शहर शाखेच्या वतीने प्रशासनास दिले निवेदन
धर्माबाद(अहमद लड्डा ):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह निवासस्थानी काही अज्ञातांनी तोडफोड केली. या घटनेबाबत सर्वच स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकरणाची राज्य शासनाकडून गंभीर दखल घेउन हल्ला करणा-यांना तात्काळ अटक करून देशद्रोही चा गुन्हा नोंदवावा असे निवेदन भारिप बहुजन महासंघ / वंचित बहुजन आघाडी तालुका शाखा व शहर शाखेच्या वतीने धर्माबाद तहसीलदार साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,गृहमंत्री यांना पाठवण्यात आले.
नवभारताचे रचनाकार,भारतीय घटनेचे शिल्पकार आणि ग्रंथासाठी घर बांधणारे जगातील एकमेव ग्रंथप्रेमी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा राजग्रह हा तमाम जगतातील मानवी जीवनाचे प्रेरणास्थान, आंबेडकरी समाजाचे श्रध्दास्थान आहे. यावर हल्ला होणे ही काही अनावधानाने घडलेली घटना नसावी. सध्या हिंदूत्वाला राजाश्रय मिळत आहे.या घटनेमूळे आंबेडकरी अनुयायात उद्रेकची लाट उसळून कोरोना महामारीच्या उपाय योजनेचे तीनतेरा करीत हे अनुयायी रस्त्यावर उतरले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी सध्या महाराष्ट्राच्या पारंपारिक राजकारणाला सळो की पळो करुन सोडणारे अँड. बाळासाहेब आंबेडकरांवर ढकलून यांच्या राजकीय प्रवासात आडथळा निर्माण करण्यासाठी केलेल्या हिंदूत्वाचा अट्टाहस आहे की काय अशी शंका आम्हास वाटत आहे.
हा भ्याड हल्ला करणारे जे कोणी विकृत मनोवृतीचे लोक आहेत.धर्माबाद तालुका शाखेच्या भारिप /वंचित बहुजन आघाडी वतीने देण्यात आलेले निवेदन पोस्टाने नांदेड जिल्हाआधीकारी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालय येथे धर्माबाद तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार हांदेश्वर साहेब व धर्माबाद पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सोहन माछरे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी भारिप बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष गौतम देवके सल्लागार जे.के.जोंधळे ता उपाध्यक्ष चांदोबा वाघमारे माजी ता.अध्यक्ष शंकरराव वाघमारे बन्नाळीकर भारतीय बौद्ध महासभा माजी तालुका अध्यक्ष गंगाधर धडेकर राहुल भुतनरे ता.प्रवक्ता मारोती कांबळे शंकरराव सोनटक्के अवनदास वाघमारे, सोनटक्के साहेब सामाजिक कार्यकर्ते तथा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जि.पी.मिसाळे बहुभाषीक पत्रकारसंघाचे अध्यक्ष माधव हणमंते सुदर्शन वाघमारे भारिप बहुजन महासंघाचे धर्माबाद शहराध्यक्ष भगवान कांबळे सह अनेकांच्या स्वाक्षरी आहेत निवेदन देते वेळी कोरोना चे पुर्ण नियम पालण करुन निवेदन देण्यात आली.
COMMENTS