धर्माबाद (अहमद लड्डा)
*1) दूध_उत्पादक_शेतकऱ्यांना_32_रू_प्रती_लिटर_भाव_देणे*.
2) *पिक_विमा_मुदतीत_दिनांक* *31/ 08/ 2020 पर्यंत मुदतवाढ करणे*
3)14314 *ग्रामपंचायतीवर_होत_असलेल्या_नियमबाह्य_प्रशासक_नियुक्ती_ठराव_रद्दकरून_ग्रामपंचायतीला_मुदतवाढ_द्यावी*.
सदरील निवेदन देत असताना रविंद्र पोतगंटीवार , भाजपा जि. उपाध्यक्ष, रामचंद्र पाटील बन्नाळीकर भाजपा ता.अध्यक्ष संजय पाटील शेळगावकर, पिराजी पाटील चव्हाण साईनाथ शिरपूरे सोशियल मिडिया जिल्हाध्यक्ष, नांदेड.
सध्याचे दुधाचे दर पाहता शेतकऱ्यांच्या दुधाला 20 ते 22 रुपये एवढा प्रति लिटर प्रमाणे दुधाचा दर आहे. कोरोणा च्या वैष्विक माहामारी मध्ये , पशूच्या देखभाली साठी लागणारे पशुखाद्य ,वैरण , इत्यादी..... बाबी महाग असल्यामुळे शेतकऱ्यांना आता असलेले दुधाचे दर न परवडणारे आहेत . तेव्हा शासनास विनंती की , सर्व परिस्थितीचा गांभीर्य पूर्वक विचार करून प्रतिलिटर 32 रुपये प्रमाणे दुध घेण्यात यावे, किंवा शेतकऱ्यांना प्रतिलिटर दहा रुपये याप्रमाणे अनुदान देण्यात यावे.
2):- पिक विमा योजनेस नांदेड जिल्ह्यात कोरोना ची व्याप्ती वाढल्यामुळे 13 जुले ते 23 जुलै पर्यंत संपूर्ण संचारबंदी चा काळ असल्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा भरता आला नाही , तेव्हा शासनाने सदरील पीक विमा भरण्यासाठी दिलेल्या मुदतीत वाढ करून ती तारीख 31 ऑगस्ट पर्यंत करावे. त्यामुळे सर्व शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचित राहणार नाहीत.
3):- 14314 ग्रामपंचायतीवर होत असलेल्या नियम बाह्या प्रशासक नियुक्त्या च्या संदर्भात घेतलेला ठराव रद्द करून, अस्तित्वात असलेल्या ग्रामपंचायतीला मुदतवाढ देण्यात यावे. असे न झाल्यास भारतीय सविधाना वरून नागरिकांचा विश्वास नाहीसा होईल व सदरील नियुक्ती ही घटना बाह्य ठरेल. तेव्हा शासनास विनंती की, सदरील पारित झालेला ठराव रद्द करून सदरील ग्रामपंचायतीना दिलासा देण्यात यावा.....
वरील सर्व बाबींचा विचार न झाल्यास भाजपा तालुका धर्माबाद च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल येईल.
COMMENTS