आदिवासी मन्नेरवारलू , कोळी महादेव जमाती बद्दल अपशब्द वापरणाऱ्या गोवर्धन मुंढे यास शासन सेवेतून बडतर्फ करून ऍट्रासिटी गुन्हा दाखल करा आफ्रोह संघटना


 


----------


नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )


 


नांदेड जिल्हात गेल्या काही दिवसांपासून मांडवा ता. किनवट येथील नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले प्रा. शिक्षक श्री गोवर्धन संतराम मुंढे हे आदिवासी मन्नेरवारलू ,कोळी महादेव समाजाबद्दल सातत्याने प्रसिध्दी माध्यम व समाजमाध्यमातून बदनामीकारक वक्तव्य करत आहेत.शासकीय कर्मचारी असून राजकीय नेत्यांप्रमाणे वृत्तपत्र, टि.व्हि. चॅनलला मुलाखती देऊन समाजाचे सामाजिक व मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.त्यांनी महाराष्ट्र जि. प. सेवा अधिनियम १९६४ व १९६७ चा भंग केलेला आहे. त्यांच्यामुळे आदिवासी समाजात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.त्यांचा शिक्षक म्हणून सेवाकाळ सतत वादग्रस्त राहिलेला आहे.त्यांच्याविरुद्ध प्रशासनाकडे गेल्या अनेक वर्षापासून तक्रारी देण्यात आलेल्या आहेत. मात्र राजकीय वरदहस्त असल्याने त्यांची नेतेगिरी व दादागिरी सतत वाढत आहे. त्यांना शासन सेवेतून बडतर्फ करावे.त्यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत(ऍट्रासिटी) गुन्हा दाखल करावा..अशी मागणी मा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य व मा मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांच्याकडे करण्यात आली आहे.


सदर निवेदनआफ्रोह राज्यशाखेच्या वतीने नांदेड जिल्हाशाखेने दिलेले आहे. या निवेदनावर राज्याध्यक्ष श्री शिवानंद सहारकर, कार्याध्यक्ष श्री राजेश सोनपरोटे,उपाध्यक्ष श्री रुपेश पाल,सचिव श्री गजानन सोरते,यांच्या स्वाक्षरी आहेत.यावेळी मा जिल्हाधिकारी नांदेड व मा मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड,यांना निवेदन देताना आफ्रोहचे जिल्हापदाधिकारी उपस्थित होते.श्री.माधवराव अडबलवाड, श्री साईनाथ रामोड,श्री गंगाधर अंदेलवाड, प्रा येसलवाड,माधव लोलापोड,नागेश लोलापोड,हणमंत माळी, भीमराव पडलवार यांच्यासह जिल्हाध्यक्ष दत्तात्रय अन्नमवाड उपस्थित होते.असे प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल कल्याणपाड यांनी कळविले आहे...


टिप्पण्या