कोरोनाच्या नावा खाली माजलगाव बस स्थानकात दुर्गंधी


 


माजलगाव/भास्कर गिरी 


     गेली साडेचार महिन्या पासून जगात कोरोना विषाणूने थाईमान घातले आहे. या कोरोनाच्या नावा खाली शहरातील जुने बस स्थानक व नवे बस स्थानक अस्वच्छ व दुर्गंधी ने माखले आहे.


         मागील साडेचार महिन्या पासून कोरोना विषाणूने शिरकाव घातला असल्याने देशात लॉक डाऊन केले आहे. या लॉक डाऊन च्या कार्यकाळात माजलगाव बस स्थानकाची सपासपाई, खराब झालेले अंतर्गत रस्ते दुरुस्त करणे गरजेचे असताना याबतीत मात्र परिवहन महामंडळाच्या अधिकारी मूग गिळून गप्प बसले आहेत. बस स्थानक परीसरात लघुशंका करणाऱ्यांची संख्या वाढल्याने घाणीचे साम्राज्य अधिकच वाढले आहे. बस स्थानक परिसरात सौचालय असतांना शहरातील नागरिक डेपो मॅनेजर च्या डोळ्यासमोर उघड्यावर लघुशंका करत असतांना डेपो मॅनेजर दुर्लक्ष करीत आहेत. बस स्थानक परिसराच्या घाणी मुळे नागरी आजारी पडण्यास नाकारत येत नाही म्हणून वेळीच बस स्थानक परिसरात उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांवर आवर घालावा नसता बस स्थानक परिसरातील घाणी मुळे माजलगाव शहरातील नागरिकांना रोगाला सामोरे जावे लागेल हे मात्र नकी.


 


-------------------------------


शहरातील डेपो मॅनेजर च्या आशिर्वादाने बस स्थानक परिसरात कार, मोटारसायकल, ॲटो ची पार्किंग होत असताना डेपो मॅनेजर चा अर्थपूर्ण कानाडोळा ?


टिप्पण्या