दिंद्रुड च्या विश्वासचा होणार डिजी डिस्क पुरस्काराने सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते झाली होती निवड 

 



संतोष स्वामी। दिंद्रुड (बीड) 


 


उत्तर प्रदेश च्या गाझियाबाद येथिल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे शिपाई तथा बीड जिल्ह्यातील दिंद्रुड चे भुमीपुत्र विश्वास उर्फ शशिकांत प्रभाकर देशमाने यांच्या ८१ सदस्यांच्या संघाने २६ जानेवारी २०२० रोजी राजपथावर केलेल्या राष्ट्रपतीं समोरील कवायतीत प्रथम प्रथम क्रमांक मिळवला होता नुकतेच त्या अनुषंगाने पत्र देशमाने यांना मिळाले असुन पुढिल महिन्यात त्यांना डिजी डिस्क पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 


 


केंद्रीय ओद्योगिक सुरक्षा बल, दिल्ली पोलिस, भारत-तिबेट सिमा पोलिस दल, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स, तटरक्षक दल, एन. सी. सी, ब्लॅक कमांडो आदी संघ प्रजासत्ताक दिनी राजपथ ते लाल किल्ला कवायतीत शामिल झाले होते. राष्ट्रपतींना मानवंदना देत जवळपास पंधरा किलोमीटर पथसंचलन करत सर्व संघ लाल किल्ला येथे कवायतीचा समारोप करतात.या कवायतीत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाने प्रथम क्रमांक मिळवला असुन या संघातील ८१ सदस्यांचे पुढील महिन्यात डिजी डिस्क पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 


केंद्रीय सुरक्षा बलात महाराष्ट्रातील १० जणांची निवड या पथसंचलनासाठी झाली होती. बीड जिल्ह्यातील दिंद्रुड च्या विश्वास ने अतिशय जोखमीचे परिश्रम घेत हे यश मिळवले आहे. डिजी डिस्क हा पोलिस क्षेत्रातील बहुमोल सन्मान असुन त्यास मि पात्र ठरल्या बाबत आनंद असल्याचे विश्वास देशमाने यांनी ग्लोबल मराठवाडाशी संवाद साधला असता सांगितले आहे. कोट- "वडीलांचे छत्र डोक्यावर नव्हते तरी स्वकष्टाने भारतीय सैन्य दलात माझा मुलगा काम करतोय याचा आनंद तर आहेच, त्या पेक्षा ही त्या क्षेत्रात त्याचे बहुमोल काम करतांना पाहुन विश्वास बद्दल मला अभिमान वाटतो आहे" - कस्तुराबाई प्रभाकर देशमाने , आई


टिप्पण्या