शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यस्थीने दीडशे टन युरिया खताचे वाटप..
माजलगाव (प्रतिनिधी) तालुक्यात यावर्षी मृगपेरणी झालेली असून कापुस,तुर,बाजरी,सोयाबिन,मुग,उडीद आदी पिकं जोमात आहेत. परंतु कृषी सेवा केंद्र शेतकऱ्यांना कृत्रिम रीतीने युरिया खताची टंचाई दाखवून, चढ्या भावाने युरिया विक्री करण्याचे काम करत आहेत, त्यामुळे शेतकरी माजलगावच्या मोंढ्यात अनेक दुकानावर चकरा मारून देखील शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नाही ही बाब शेतकरी कामगार पक्षाच्या निदर्शनास आल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाईअॅड. नारायण गोले पाटील यांनी कृषी अधिकारी श्री संगेकर व श्री हजारे यांच्याकडे कृषी सेवा केंद्राची तक्रार करून व कृषी सेवा केंद्राच्या संचालकांना समज देऊन तालुक्यातीलअनेक उपेक्षित शेतकऱ्यांना दीडशे टन युरिया खताचे वाटप करण्यास भाग पाडले.
कोरणा रोगाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लाॅक डाऊन असल्याच्या कारणावरून काही कृषी सेवा केंद्र युरिया खताची कृत्रिम टंचाई भासवून चढ्या भावाने विक्री करत होते व या खतासोबत इतर खत घेण्याची सक्ती करत होते, त्यामुळे शेतकऱ्यांना इतर खतांची आवश्यकता नसताना देखील नाईलाजास्तव इतर खत खरेदी करावा लागत असे त्यामुळे शेतकऱ्यांची विनाकारण पिळवणूक होत असे ही बाब शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाईअॅड. नारायण गोले पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, विभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी करून शेतकऱ्याची लुट करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कार्यवाही करण्यास भाग पाडले असल्याने कृषी सेवा केंद्रा कडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक वेळीच थांबली व उपेक्षित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले त्यामुळे सामान्य शेतकरी समाधानी झाला असून पिकांना वेळेवर खत देणे शक्य झाले आहे. याबाबत तालुक्यातील सामान्य शेतकरी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई अॅड.नारायण गोले पाटील यांचे आभार मानत आहे..
COMMENTS