मुंबई :- करोनामुळे राज्यात लॉकडाऊन चालू आहे त्याची मुद्दत ३१ जुलै पर्यंत आहे; ती मुदत आणखी वाढवू नका, अन्यथा नागरिक बेरोजगारी आणि उपासमारीने मरतील, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.
राज्याची बिघडलेली आर्थिक घडी कशी बसवता येईल, याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. केंद्र व राज्य सरकारने अर्थव्यवस्था सुधारण्याच्या कामाला लागावे, तरच माणसे जगतील, अन्यथा करोनाने कमी तर उपासमारीने अधिक मरतील, असे त्यांनी म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी सांगितल्या प्रमाणे, भारतीयांची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे, त्यामुळे त्यांना जास्त काही होणार नाही. ते करोनाने नाही तर रोजगार बुडाल्याने मरतील. त्यामुळे तुम्ही टाळेबंदी वाढवू नका, असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे. पुन्हा टाळेबंदी लादणे धोक्याचे ठरेल, अशी वंचित आघाडीची भूमिका त्यांनी मांडली आहे.
COMMENTS