जिल्ह्यात ७२ बाधितांची भर कोरोनातून २१ व्यक्ती बरे तर एकाचा मृत्यू

 



नांदेड :- न्यूज नेटवर्क 


जिल्ह्यात काल २६ जुलै रोजीच्या अहवालानुसार ७२ व्यक्तींचे अहवाल बाधित आले तर २१ व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. कालच्या एकूण २४३ अहवालापैकी १६१ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता १ हजार ३२४ एवढी झाली असून यातील ६९३ एवढे बाधित बरे झाले आहेत. ५६२ बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील १० बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात ४ महिला व ६ पुरुषांचा समावेश आहे. रविवार २६ जुलै रोजी भोकर येथील ५० वर्षाच्या एका महिलेचा शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या ५७ एवढी झाली आहे.


 


काल बरे झालेल्या २१ बाधितांमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील ५, बिलोली कोविड केअर सेंटर मधील २, कंधार कोविड केअर सेंटर मधील २, मुखेड कोविड केअर सेंटर मधील २, नायगाव कोविड केअर सेंटर मधील ५, गोकुंदा कोविड केअर सेंटर मधील १ व खाजगी रुग्णालयातील ४ बाधितांचा यात समावेश आहे. आतापर्यंत एकुण ६९३ बाधित व्यक्तींना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे.


 


नवीन बाधितांमध्ये पंचायत समिती परिसर नांदेड ८५ वर्षाचा १ पुरुष, इतवारा येथील ६५ वर्षाची १ महिला, काबरानगर नांदेड येथील १९ वर्षाचा १ पुरुष, शिवशक्ती नांदेड येथील १० बाधित यात अनुक्रमे ३, ७, २५, ३०, ५२ वय वर्षाचे ५ पुरुष तर अनुक्रमे १२, २५, २९, ४२, ४८ वय वर्षाच्या ५ महिला, एसपी ऑफीस परिसर ६० वर्षाची १ महिला, पाठक गल्ली येथील अनुक्रमे ७, २४, २८ वय वर्षाचे ३ पुरुष, कलामंदीर नांदेड येथील २६ वर्षाचा १ पुरुष, बाबानगर नांदेड येथील ३४ आणि ३६ वर्षाचे २ पुरुष, एमजीएम कॉलेज परिसर येथील ३२ वर्षाची १ महिला, आशिर्वाद गार्डन परिसरातील ३७ वर्षाचा १ पुरुष, मीलगेट येथील ५९ वर्षाचा १ पुरुष, महाविर सोसायटी नांदेड येथील ३० वर्षाचा १ पुरुष, जुना कौठा येथील ३० व ३४ वर्षाचे २ पुरुष तर ५३ वर्षाची १ महिला, हडको नांदेड येथील ७३ वर्षाचा १ पुरुष व ४५ वर्षाची १ महिला, सिडको नांदेड येथील ६८ वर्षाचा १ पुरुष, चौफाळा नांदेड येथील ३५ वर्षाचा १ पुरुष, सगरोळी बिलोली येथील ६२ वर्षाचा १ पुरुष, मोहमंद नगर भोकर येथील ५० वर्षाची १ महिला, हदगाव येथील ३८ वर्षाचा १ पुरुष व ३५ वर्षाची १ महिला, तामसा येथील १८, २७, २८, ३३ वय वर्षाचे ४ पुरुष, शारदानगर देगलूर येथील २१ वर्षाचा १ पुरुष, ४० वर्षाची १ महिला, मुछी गल्ली देगलूर येथील ५७ वर्षाचा १ पुरुष, रफिक कॉलनी येथील ५३ वर्षाची १ महिला, सत्यमनगर देगलूर येथील २१ वर्षाचा १ पुरुष, हत्तीपुरा कंधार येथील ६५ वर्षाची १ महिला, नायगाव येथील ७२ वर्षाची १ महिला, कोलंबी येथील ३५ वर्षाची १ महिला, धर्माबाद येथील ३६ वर्षाचा १ पुरुष, २० व ५४ वर्षाचे २ पुरुष, फुलेनगर मुखेड येथील ८ वर्षाचा एक मुलगा व २५ वर्षाची १ महिला, १५ व ३५ वर्षाचे २ पुरुष, अनुक्रमे १२, २८, ५५ वर्षाच्या ३ महिला, ७० वर्षाचा १ पुरुष, ६५ वर्षाची १ महिला, अंबुलगा येथील ३२ व ३९ वर्षाच्या २ महिला, वडगाव येथील २२ वर्षाचा १ पुरुष व ४१ वर्षाची १ महिला, जहूर येथील ५, ७, २५ वय वर्षाच्या २ महिला, संतगाडगेबाबानगर येथील ६० वर्षाची १ महिला, खरबखेड येथील ५५ वर्षाचा १ पुरुष, परभणी जिल्ह्यातील बरबडी येथील ८० वर्षाचा १ पुरुष, गंगाखेड येथील ५० वर्षाचा १ पुरुष हे सर्व आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे बिके हॉल श्रीनगर नांदेड येथील १६ व ४७ वर्षाचे २ पुरुष बाधित आढळले.


 


जिल्ह्यात ५६२ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १०४, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे २१३, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे २७, नायगाव कोविड केअर सेंटर येथे ८, बिलोली कोविड केअर सेंटर येथे ३, मुखेड कोविड केअर सेंटर येथे ७७, देगलूर कोविड केअर सेंटर येथे ३२, उमरी कोविड केअर सेंटर १०, लोहा कोविड केअर सेंटर येथे १०, हदगाव कोविड केअर सेंटर ९, भोकर कोविड केअर सेंटर १, कंधार कोविड केअर सेंटर येथे ८, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे ८, खाजगी रुग्णालयात ४५ बाधित व्यक्ती उपचार घेत असून ५ बाधित औरंगाबाद येथे, निजामाबाद येथे १ बाधित तर मुंबई येथे १ बाधित संदर्भित झाले आहेत.


 



  • जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

  • सर्वेक्षण – १ लाख ४८ हजार ५२२,

  • घेतलेले स्वॅब – १२ हजार २८१,

  • निगेटिव्ह स्वॅब – ९ हजार ८१४,

  • आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या – ७२,

  • एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती – १ हजार ३२४,

  • आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या – ८,

  • आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या – १,

  • मृत्यू संख्या – ५७,

  • रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या – ६९३,

  • रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती – ५६२,

  • आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या – ३०९.

  • प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील.

  •  


कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.


टिप्पण्या