माजलगाव (प्रतिनिधी)
भा.शि.प्र.संस्थेच्या श्री सिद्धेश्वर महाविद्यालयात 'अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष'विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2020-21रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्त एक दिवसीय 'आयपीआर'(बौद्धिक संपदा अधिकार)या राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.हा राष्ट्रीय वेबिनार बुधवार दि.22 जुलै 2020 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत असून याकरिता विषय तज्ञ म्हणून प्राचार्य डॉ.बेटकर एम.एम.(औसा)हे मार्गदर्शन करणार आहेत.या वेबिनारचे उदघाटक भा.शि.प्र.संस्थेचे कार्यवाह नितीनराव शेटे तसेच अध्यक्ष म्हणून श्री सिद्धेश्वर महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभय कोकड हे उपस्थित राहणार आहेत.
या राष्ट्रीय वेबिनारला अधिकाधिक प्राध्यापक ,संशोधक,शिक्षक,विदयार्थी तसेच समाजातील विविध घटकातील इच्छुकांनी आपला सहभाग नोंदवावाअसे आवाहन भा.शि.प्र.संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलूरकर,उपाध्यक्ष राधेश्याम लोहिया,सहकार्यवाह प्रा. चंद्रकांत मुळे, डॉ.हेमंत वैद्य,डॉ.कल्पना चौसाळकर,केंद्रीय सदस्य तथा संकुलाचे पालक सुनील लोढा तसेच स्थानिक पदाधिकारी प्रकाश दुगड,अमरनाथ खुर्पे,सुमंतराव वाघोरकर,प्राचार्य डॉ.भालचंद्र कराड,उपप्राचार्य डॉ.गजानन होन्ना,प्रा. युवराज मुळ्ये, प्रा. संतोष लिंबकर तसेच राष्ट्रीय वेबिनारचे आयोजक डॉ.विनायक देशमुख यांनी केले आहे.
COMMENTS