...
दलित,आदिवासींवरील अन्याय अत्याचार थांबवून खटले जलदगती न्यायालयात चालवा -- अँड.अमोल डोंगरे
माजलगाव / बीड : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील शिवसेना,राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉँग्रेस सरकारचा नाकर्तेपणा जनतेसमोर आणण्यासाठी राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोशल डिसटंसिंगचे काटेकोर पालन करुन धरणे आंदोलन करण्याचे आदेश बसपाच्या सुप्रीमो बहन मायावती यांनी दिलेल्या आदेशावरून व महाराष्ट्र प्र.प्रभारी मा .खासदार वीरसिंग,प्रदेश अध्यक्ष अँड.संदीप ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा अध्यक्ष अँड. अमोल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी यांनी हे निवेदन बीड जिल्हाधिकारी यांना सोशल डिसटंस ठेवून व जमाव बंदी आदेशाचे पालन करुन दिले.
भाजप सरकारच्या राज्यकारभाराला वैतागलेल्या महाराष्ट्रातील जनतेने कोणालाही स्पष्ट बहुमत दिले नाही.त्यामुळे राज्यात शिवसेना,राष्ट्रवादी व कॉँग्रेसचे त्रिकूट सरकार अस्तित्वात आले.सरकार स्थानापन्न झाल्यानंतर राज्यातील जनतेला याचा पश्चाताप झाला असून हे सरकार अपयशी ठरले असल्याने या सरकारचा नाकर्तेपणा जनतेसमोर आणण्यासाठी व नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी बसपा च्या वतीने विविध मागण्यांसाठी हे निवेदन देण्यात आले.
राज्यात दिवसेंदिवस दलित आदिवासीयांवरील अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी सरकारने विशेष लक्ष केंद्रित करुन हे खटले जलदगती न्यायालयात चालवून या खटल्यात विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करुन दोषींवर कडक शिक्षा ठोठावण्यात यावी,कोविड संक्रमित रुग्णांना मोफत उपचार व 1 लाखांची मदत देण्यात यावी,कोविड 19 मुळे मयत झालेल्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये मदत द्या, राज्यातील इंधन दरवाढ आटोक्यात आणण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात,लॉकडाऊन काळात देण्यात आलेले वीज बिल माफ करण्यात यावं,19-20 व शैक्षणिक वर्षे 20-21 चे सर्व शुल्क माफ करण्यात येवून विशेष सवलत देवून मागील वर्षाची शिष्यवृत्ती तात्काळ विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी,लघु उद्योग,बांधकाम मजूर,बलुतेदार यांना अनुदान देण्यात यावं,सर्व जिल्हानिहाय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची कायम स्वरूपी व्यवस्था करण्यात यावी,शेतकऱ्यांना नवीन अनुदान,पीक कर्ज तत्काळ वाटप करण्यात यावे,ग्रह कर्ज,वाहन कर्ज,तारण कर्ज,सूक्ष्म उद्योग कर्ज व बचत गटाचे सहा महिन्याचे हप्ते माफ करुन त्यांना रोख अर्थ सहाय्य करावे, रिक्षा,टेम्पो व मालवाहतूक करणारी वाहन कर्ज माफ करण्यात यावे.या मागण्यांसह इतर मागण्यांसाठी बहुजन समाज पार्टीचे बीड जिल्हा अध्यक्ष अँड.अमोल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.यावेळी बहुजन समाज पार्टीचे संजय मिसाळ बीड जिल्हा प्रभारी,सतिश कापसे जिल्हा प्रभारी बीड,अफरोज अत्तार जिल्हा सचिव ,अरविंद लोंढे विधानसभा अध्यक्ष,माजलगाव हे प्रमुख पदाधिकारी उपस्थीत होते.
COMMENTS