अत्यंत गंभीर,वेदनादायक. लातूरचे पत्रकार मित्र गंगाधर सोमवंशी यांचे कोरोनाने निधन

.




  • लातूरचे पत्रकार मित्र गंगाधर सोमवंशी यांचे कोरोनाने निधन झाल्याची बातमी वाचली आणि श्रद्धांजली वाहण्या अगोदरच त्यांनी लिहिलेले एक पत्र मेडियात आले.ते वाचून झालेल्या वेदना शब्दात मांडणे कठीण आहे.गंगाधर सोमवंशी यांनी त्यात स्पष्ट लिहिले आहे की खाजगी रुग्णालयाचे deposit पाहून मी शासकीय रुग्णालयात दाखल झालो आहे..त्यांनी दिलेले आकडे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत आणि पालकमंत्री अमित देशमुख यांनी एकदा नजरेखालून घालायला हवेत.इतकी गंभीर परिस्थिती आहे,कुठलीही लस उपलब्ध नाही,औषध कोणते द्यावे याचे कुठलेही नियोजन नाही आणि विशेष म्हणजे वाचण्याची किंवा वाचवण्याची कसलीही शक्यता नसताना खाजगी रुग्णालयावर सरकारचा का अंकुश नाही..कालच आमचा मित्र नागेश माने यांचे निधन झाले,त्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार मिळतील म्हणून तो मार्ग स्वीकारला मात्र तिथे त्यांना अप्याश आले.आज गंगाधर सोमवंशी यांनी खाजगी रुग्णालयाचा खर्च परवडत नाही म्हणून शासकीय रुग्णालय गाठले तिथेही त्यांना अपयश आले.अशी परिस्थिती असताना खाजगी रुग्णालयावर चाप का लागत नाही असा प्रश्न आहे.गंगाधर सोमवंशी आयुष्यभर परिस्थितीशी संघर्ष करत जगत राहिले.लाखो,कोटीच्या आकड्याचे बजेट छापणाऱ्या पत्रकारांची शेवट अशी व्हावी आणि त्याला लिहून ठेवावे लागते हे अत्यंत दुर्दैवी आहे.खाजगी रुग्णालयांना काही आचारसंहिता घालायला हवी.आता नाहीतरी बाकीचे सगळे आजार आपोआपच गेले आहेत अश्यावेळी खाजगी रुग्णालयांनी सेवाभाव म्हणून काही करायला हवे.प्रत्येकवेळी पैश्यात मोजायचे असेल तर,समाजसेवेच्या पोकळ गप्पा कशाला मारायला हव्यात असा प्रश्न आहे.


 


पालकमंत्री अमित देशमुख आणि जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी याचा विचार करायला हवा..कारण विद्यकिय शिक्षणमंत्री आपले आहेत..


 


माझ्या पत्रकार मित्रानो,कुणासाठी जीव धोक्यात घालत आहात..कानाकोपऱ्यातून आवाज उठला पाहिजे म्हणून रात्रंदिवस कुटुंब संकटात घालून फिरणारे आपण,ना सरकार दरबारी तुमचा न्याय आहे ना आपण जिथे काम करतो त्या संस्थेला आपली चिंता आहे.सगळ्यांनी आपली पोटे भरली आहेत,पत्रकारांच्या मेहनतीवर मोठमोठे हाऊस उभारून सगळे गब्बर झाले आहेत.त्यांचे सगळ्यांचे तुपाशी सुरू आहे आणि आपण मात्र उपाशी आहोत..आयुष्यभर समाजासाठी राबून एखादा खाजगी डॉक्टर आपल्याला मोफत सुविधा देण्याइतपत आपण राहिलो नाही,ही खंत आज मनामध्ये आहे.सगळी सोंग करता येतात पैश्याचे नाही हे अनेकदा सिद्ध झाले आहे.पत्रकारांच्या संघटना केवळ राजकीय पुढाऱ्यांसमोर मिरवण्याचा उद्योग करत आल्या आहेत.अनेक पत्रकारांच्या कुटुंबात आजही अत्यंत वाईट अवस्था आहे.पत्रकार संघटनांनी किमान पत्रकारांच्या आरोग्याची आणि त्यांच्या आरोग्य विम्याची तरी काळजी घ्यायला हवी,असे वाटते.आजच्या या घटनेने सगळ्यांनाच विचार करायला भाग पाडले आहे..


 


गंगाधर सोमवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली..


 


@ संजय जेवरीकर


      पत्रकार


ग्लोबल मराठवाडा च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐💐


टिप्पण्या