नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
नांदेड जिल्यातील मुखेड तालुक्यातील आंबुलगा (बु) येथे दि.२१ रोजी कोरोना बाधित पहिल्या रूग्णाचा अहवाल पाॕझिटिव्ह आल्यानंतर तेव्हा पासुन मुख्य बाजारसापेठ संपुर्ण पणे बंद आहे..देगलूर चे उपविभागिय अधिकारी शक्ती कदम यांनी दि.२५ रोजी आंबुलगा (बु) कंटेनमेंट झोन म्हणून आदेश काढले व तालुक्यातील विविध अधिकाऱ्यांची नेमणुक हि केली .मात्र हि नेमणुक आरोग्य विभाग वगळता इतर अधिकाऱ्यांनी कागदोपत्रीच ठेवली. त्यामुळे येथे नेमणुक केलेल्या एकाहि अधिकाऱ्यांची उपस्थिती नाही...गावातील अनेक घरातील कुटुंबात माघिल ६ दिवसापासुन सर्व दुकाने बंद असल्यामुळे उदरनिर्वाह साठी अन्न - धान्य ही नाही ..गावात अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी उपविभागिय अधिकारी देगलूर यांनी तालुक्यातील अधिकाऱ्यांची नेमणुक ही केली पण ती केवळ कागदोपत्रीच असल्यामुळे कोरोना मुळे कमी पण उपासमारी मुळे मरण्याची वेळ येत आहे...त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांची आंबुलगा (बु) या कंटेनमेंट झोन मध्ये नेमणुक केली आहे...त्यांना गावात तात्काळ हजर होण्याचे आदेश काढावेत..व नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी आंबुलगा (बु) येथिल हातावर पोट आसणार्या नागरिकांकडुन होत आहे...
COMMENTS