- गुरूपोर्णिमा घरीच राहुन साजरी करा.
धर्माबाद (अहमद लड्डा ) गुरूपोर्णिमा
केन्द्रात न जाता,किंवा केन्द्रात गर्दी न करता हा उत्सव घरीच राहून साजरा करावे आसे आव्हान गुरू पिठाचे पीठाधिश परम पूज्य गुरूमाऊलीने केले आसल्याची माहीती उपरोक्त संयोजकांनी प्रतिनिधीशी बोलतांना दिली.
पाच जून 2020 वार रविवार या दिवशी श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) धर्माबाद जिल्हा नांदेड (महाराष्ट्र) येथे गुरुपौर्णिमा (दिंडोरी प्रणित उत्सव) असल्यामुळे आपण सर्व सेवेकरी दरवर्षी मोठया उत्साहात केंद्रामध्ये गुरुपूजन करत असतो. परंतु यावर्षी covid-19 कोरोना महामारी कलम 144 अर्थात लॉक डाऊन भारत सरकारने घोषित केले असल्यामुळे परम पूज्य गुरुमाऊली यांच्या आदेशानुसार यावर्षी केंद्रात न जाता किंवा केंद्रात जास्त गर्दी न करता घरच्या घरी स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर श्री सूक्त पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करून ते तीर्थ घरच्या घरी सर्वांनी
अकाल मृत्यू हरण सर्व ब्याधी विनाशनम, श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थें
जठरे धारयाम्ह!
शीरसा धारयाम्ह!
असा मंत्र म्हणून तीर्थ प्राशन करून गुरुपद घ्यावे. व कोरो ना लवकरात लवकर समूळ नष्ट होवो.असे साकडे आपण स्वामी महाराज यांना घालावे असे आव्हान केंद्रातील प्रतिनिधी यांनी गावातील सेवेकरी यांना केले आहे.
COMMENTS