--------------------------------
*देवणी पंचायत समितीच्या पुढे आंदोलन करू --सौ वर्षाताई गायकवाड ग्राम पंचायत सदस्य नागराळ*
---------------------------------
देवणी : तालुक्यातील जवळपास बत्तीस ग्रामपंचायतीची मुद्दत 24 जुलै रोजी संपत असून या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली चालू झाल्या आहेत लवकरच या ग्रामपंचायतीवर प्रशासक येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असून या पूर्वी पाच वर्षे कार्यरत असलेल्या सदस्य यांचे गेली तीन चार वर्षे मानधन दिले नाही ग्रामपंचायत सदस्य यांचे मानधन त्वरित देण्याची मागणी तालुक्यातील सदस्य यांनी केली आहे
सरपंच उपसरपंच यांचे मानधन त्याच्या खात्यावर जमा झाले मात्र तालुक्यातील एकाही सदस्य यांचे मानधन किंवा बैठक भत्ता म्हणून दिलेली नाही हे मानधन सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने हडप केले असल्याची चर्चा तालुक्यात असून हे मानधन गेले कोठे यांची उच्च स्थरिय चौकशी करून संबंधितांवर कारवाई मागणी होत आहे
जो पर्यंत सदस्यांचे मानधन दिले जात नाही तोपर्यंत प्रशासकाची नियुक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी केली जात आहे या तालुक्यातील सर्व सदस्यांचे मानधन वाटप करण्यात यावे मगच प्रशासकाच्या नियुक्त्या कराव्या अन्यथा देवणी पंचायत समितीच्या पुढे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे
COMMENTS