माजलगाव (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत केसापुरी वसाहत येथील जवाहर उच्च माध्यमिक विद्यालयाचा कला शाखेचा निकाल ७५.९२ टक्के लागला असून दाभाडे मोहिनी उत्तमराव ८१.३८, कांबळे दिपाली दशरथ ७८.३०, कोरडे सुनिता अनिलराव ७७.३८, पठाण आयशा अन्वर ७५.८४ असे गुण घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थीनींनी आपली यशस्वी परंपरा कायम राखली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना एस.बी.सांगळे, एस.जी.राठोड, एस.डी.लऊळकर, एन.बी.चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल नवविकास मंडळाचे अध्यक्ष ॲड.एस.आर.शर्मा, कार्यवाह मा.आ.डी.के.देशमुख, शालेय समितीचे अध्यक्ष ॲड.आर.डी.भिलेगावकर, संचालक ॲड.एस.बी.मुळी, ॲड.ए.एम.मोगरेकर, आर.बी.देशमुख, जी.एल.जोशी, प्राचार्य अभिमन्यु इबिते, पर्यवेक्षक के.एल.मोताळे यांनी अभिनंदन केले.
COMMENTS