- कोव्हिड-19 च्या पार्श्वभुमिवर प्रशासनाकडून जनजागृती
- - उपविभागीय अधिकारी ठाकुर यांनी दिली जदिद जवळा येथे भेट
माजलगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील जदिद जवळा येथील कोव्हिड-19 पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभुमिवर प्रशासनाने जनजागृतीची मोहिम हाती घेतली. त्यानूसार गुरूवारी उपविभागीय अधिकारी शोभा ठाकुर यांनी कंन्टेनमेट झोन असलेल्या जदिद जवळा येथे भेट देवून नागरिकांशी संवाद साधून दक्षतेच्या सुचना दिल्या.
माजलगाव तालुक्यात कोव्हिड-19 च्या पार्श्वभुमिवर प्रशासन सुरूवातीपासूनच सतर्क आहे. त्यानूसार दोन दिवसापूर्वी जदिद जवळा येथील कोव्हिड-19 पॉझिटीव्ह रूग्ण आढळला. यावर उपविभागीय अधिकारी शोभा ठाकुर यानी गुरूवार दि.16 रोजी सकाळी 12.30 वा. भेट दिली. याप्रसंगी नागरिकांशी बोलतांना ठाकूर म्हणाल्या, कोव्हिड-19 चा रूग्ण आपल्या गावात निघाला आहे. त्यामुळे घाबरून न जाता काळजी घ्यावी. तसेच गावात बाहेरील व्यक्तींना प्रवेश देवू नये, तसेच गावातील व्यक्तींनी बाहेर जावू नये. होमक्वारटाईन करण्यात आलेल्या नागरिकांना प्रशासनाच्या माध्यमातून जिवनावश्यक उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रशासन योग्य पध्दतीने काम करत असून आपण कोव्हिड-19 चा प्रसार रोखण्यासाठी दिलेल्या सुचनाचे पालन करावे, असे आवाहन केले. याप्रसंगी गटविकास अधिकारी बी.टी.चव्हाण, नायब तहसिलदार एस.एस.रामदासी, ग्रामीण ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ नरके, सरपंच कृष्णा बोचरे, ग्रामसेवक, आशासेविका आदी उपस्थित होते.
COMMENTS