नांदेड जिल्ह्यात करोना बाधित रुग्ण संख्येचा उच्चांक… काल २६ नवे रुग्ण ; दोघांचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यात करोना बाधित रुग्ण संख्येचा उच्चांक… काल २६ नवे रुग्ण ; दोघांचा मृत्यू   नांदेड :- नांदेड जिल्ह्यात दिवसे न दिवस करोना बाधित...

  • नांदेड जिल्ह्यात करोना बाधित रुग्ण संख्येचा उच्चांक… काल २६ नवे रुग्ण ; दोघांचा मृत्यू


 


नांदेड :- नांदेड जिल्ह्यात दिवसे न दिवस करोना बाधित रुग्ण संख्येत वाढ होत आहे पण काल तर करोना बाधित रुग्ण संख्येने उच्चांक गाठला तब्बल २६ नव्या रुग्नांची त्यात भर पडली. तर धनगर टेकडी इतवारा बाजार नांदेड येथील राहणाऱ्या ८३ वर्षीय पुरुषाचा व बळीरामपूर येथे राहणाऱ्या ६० वर्षीय पुरुषाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. सदरील दोन्ही रुग्णावर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचार चालू होते. दोन्ही रुग्णांना उच्च रक्तदाब, श्वसनास त्रास व मधुमेह आदी आजार होते. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात करोना बाधित रुग्ण मृत्यू संख्या २२ एवढी झाली आहे. कोरोना आजारातून काल केवळ १ रुग्ण बरा झाल्याने त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तो पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे उपचार घेत होता. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ३३५ व्यक्ती कोरोनातून बरे झाले आहेत.


 


मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालापैकी २६ बाधित व्यक्ती पॉझिटिव्ह आढल्यामुळे जिल्ह्यातील एकुण बाधित व्यक्तींची संख्या ४८४ एवढी झाली आहे. यात २ पुरुष वय ७२ वर्ष व ३९ वर्ष रा. विकास नगर कंधार जी. नांदेड, १ पुरुष वय ५२ वर्ष रा. दत्तात्रय नगर मुखेड जी. नांदेड, २ महिला वय ३५ व ६८ वर्ष रा. दत्तात्रय नगर मुखेड जी. नांदेड, १ मुलगा वय १० वर्ष रा. दापका ता. मुखेड जी. नांदेड, १ पुरुष वय ३० वर्ष रा. पोलीस कॉलनी मुखेड जी. नांदेड, १ महिला वय ३६ वर्ष रा. उत्तम निवास जिल्हाधिकारी कार्यालया समोर नांदेड, १ महिला वय 


२३ वर्ष रा. मौजे परांडा ता. कंधार जी. नांदेड, २ पुरुष वय ४७ व ६ वर्ष रा. नवीन हसापुर नांदेड, २ महिला वय २ व ५० वर्ष नवीन हसापुर नांदेड, ३ पुरुष अनुक्रमे ४, ३४, व ६१ वर्ष रा. उमर कॉलनी नांदेड,५ पुरुष वय अनुक्रमे ०५, २५, ३०, ५८ व ०५ वर्ष रा. बालाजी नगर तरोडा (बु.) नांदेड, २ महिला वय ३४ व ५५ वर्ष रा. बालाजी नगर तरोडा (बु.) नांदेड, १ महिला वय १८ वर्ष रा. पिरबुर्हाण नगर नांदेड, १ महिला वय ४२ वर्ष रा. देगलूर नाका नांदेड,१ पुरुष वय २५ वर्ष रा. पळसा ता. हदगाव जी. नांदेड यांचा समावेश आहे.


 


आतापर्यंत ४८४ बाधितांपैकी ३३५ बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत १२७ बाधितांवर औषधोपचार चालू आहेत. यातील १६ बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात ९ महिला व ७ पुरुष बाधिताचा समावेश आहे.


 


नांदेड जिल्ह्यात १२७ बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ४२ बाधित, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ५७ बाधित तर मुखेड कोविड केअर सेंटर येथे ७, हदगाव कोविड केअर सेंटर येथे २ बाधित तसेच जिल्हा रुग्णालय येथे ३, बिलोली कोविड केअर सेंटर येथे ६ बाधित व्यक्ती, हिमायतनगर कोविड केअर सेंटर येथे २, मुदखेड कोविड केअर सेंटर १, कंधार कोविड केअर सेंटर ३, नांदेड येथे खाजगी रुग्णालयात १ रुग्ण उपचार घेत आहे. तर २ बाधित औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. मंगळवार ७ जूलै रोजी ३३७ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.


 


जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.


 


• आत्तापर्यंत एकूण संशयित – ७०४३ 


• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- ६३६८ 


• क्वारंटाईन कालावधी पूर्ण – ४०२८ 


• अजून निरीक्षणाखाली असलेले – ३१८ 


• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये – १०२ 


• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले – ६२६६ 


• आज घेतलेले नमुने – २०४ 


• एकुण नमुने तपासणी- ७३०२ 


• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- ४८४ (पैकी ०४ संदर्भीत आलेले आहेत)


• पैकी निगेटीव्ह – ६१०४ • नमुने तपासणी अहवाल बाकी- ३३७ 


• नाकारण्यात आलेले नमुने -१०४ 


• अनिर्णित अहवाल – ३६९ 


• कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले – ३३५ 


• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – २२ 


• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी १४७३७६ राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.


 


कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.


सौजन्य prajapat com


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group