कोरोना महामारीत यमराजांच्या मनातील "वैफल्यग्रस्त शल्य"   शल्यकार ---दत्तात्रय एमेकर गुरुजी

                                   क्रांतिभुवन बहाद्दरपुरा """""""""""""...

     


                             क्रांतिभुवन बहाद्दरपुरा


""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""


कोरोना महामारीचा वायरस कोवीड-19 यांस,


माझा नमस्कार!


स.न.वि.वि...


आज पर्यंत मला पुर्वी फक्त आणि फक्त पटकी या आजारात ओहर टाईम करावा लागला होता.तो कालखंड 20 ते 30 च्या दशका आधीचा होता.त्यावेळी एका मानवाचा स्मशानात अंत्यविधी होतांना गावात एक-दोन तरी जणांनांचा प्राण नेण्यासाठी मला ओहर टाईम करावा लागत होता.म्हणुन तेंव्हा पासून अंत्यविधीला गेलेला व्यक्ती स्मशानातून घरी परतल्या नंतर अंघोळ केल्या शिवाय त्या व्यक्तीला घरातले सदस्य घरात येवू देत नव्हते.त्यांचे कारण म्हणजे त्या मृत व्यक्तींच्या अंगावरील जिव-जंतू अंत्यविधीस गेलेल्या व्यक्तींच्या माध्यमातून घरात येवून घरातील सदस्यांना त्या पटकी रोगाचा प्रार्दुभाव होवू नये म्हणून खबरदारी घेत असत.त्या परिस्थितीत मला मानवांचा प्राण नेण्यासाठी ओहर टाईम करावा लागला होता.त्यावेळी जागतिक स्तरावर पटकी रोगावर विज्ञानाच्या जोरावर नियंत्रण मिळवले.त्या वेळी जगातील सर्व राष्ट्रे त्यावेळच्या परिस्थितीने गांगरुन केली होती. त्या नंतर माझ्या वरील कामाचा तान कमी झाला.जवळपास शतकाचा कालखंड गेला.मला नैसर्गिक मृत्यू शिवाय एखाद दुसरा वाहनांचा वा भुकंप,महापूर,शेतकरी आत्महत्या,विज अंगावर पडून अपघात,वादळ,त्सुनामी,दंगल अशा अपदा झाल्यावर तर ओहर टाईम करावा लागतो.हा दिनक्रम होता.


आज घडीला कोरोना महामारीच्या काळात कोवीड-19 हा वायरस अख्या जगाला दहशतीखाली ठेवत आहे.जवळपास 200 पेक्षा जास्त देशांना आपल्या विळख्यात घेतल्यागत भासत आहे.जगभरात 1 लाखांच्या जवळपास लोकांचा मृत्यू झाला आहे.20 लाखांच्यावर लोकांना संसर्ग झाला आहे.अशी भयावह परिस्थिती आली आहे.जवळपास शंभराच्या वर देशात लाॅक डाऊन आहे.पुर्वी पटकी आजाराने कुणाचा मृत्यू झालातर मला यावे लागत.अंत्यविधीसाठी नाते-गोते,गावकरी उपस्थित राहत हे मी पाहिले आहे.पण.....आजच्या कोरोना महामारीत जर मृत्यू झाला तर...मला तर यावेच लागते...पण नाते-गोते,गावकरी,मित्र परिवार या पैकी एक ही जण येत नाही..तर दवाखाण्याचे कर्मचारीच त्या मृतदेहाची विल्हेवाट लावतात......ही घटना मनाला हेलावणारी आहे.मी मनाने खंबीर असून मला सुध्दा खुप यातना होत आहे.मला सर्व मानवजातीला सांगायचे आहे.आपण या कोरोना महामारीच्या काळात दिवसातून पाच-सहा वेळा हात धुवणे,तोंडाला माक्स लावणे,घरातच बसून राहणे,रस्त्यावर न येणे,सोशल डिस्टन्स ठेवणे,गर्दीच्या ठिकाणी न जाणे,शासनाच्या आदेशाचे पालन करणे हे केले तर कोरोना महामारी पासून नक्कीच मुक्ती मिळते.पण.. जगातील लोकांना मृत्यू व माझे भय वाटत नाही.ईटलीत फुटबाॅल सामन्यांतून समुह संसर्ग झाला.यर अमेरिकेत शाळा,कार्यालयांना सुट्टी दिली तेंव्हा अमेरिकन जनतेनी सहली भोगल्या त्यामुळे तेथे 20 हजार मृत्यू झाले आहे.लाखो संक्रमीत आहेत.त्या उलट भारत देशात जवळपास 80-85% लोकांनी लाॅक डाऊन हा शासनाचा आदेश पाळला आहे.या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेबांनी अगदी वेळेवर लाॅक डाऊनचा आदेश काढल्या मुळे या देशात कोरोना महामारीचे प्रस्त जगाच्या मानाने कमी आहे.या देशाचे हवामान सध्याच्या काळात उन्हाळ्याचा असल्यामुळे या फायदाच झाला.लाॅक डाऊनच्या काळात देवांची मंदिरे,प्रार्थनांच्या मशिदी,प्रेअरची चर्च,ध्यान साधनांची विहारे या काळात कुलूप बंद आहेत.मानवांतील डाॅक्टर, पोलिस,नर्सेस,फार्मासिस्ट,सफाई कामगार,प्रकाशदुत,बॅकेतील सेवाचार्य,महसूल विभाचे सेवाचार्य,महानगर पालिका,नगरपालिका,ग्राम पंचायतीचे सर्व सेवाचार्य या संकट समयी आपली सेवा बजावून देशभक्ती करत आहेत.माझ्या ओहर टाईममुळे माझी पत्नी धुमोरना व मुलगा कतिला मला प्रश्न विचारतात तुम्हाला रोजच उशीर होत आहे.उशीर होण्याचे कारण त्यांना सांगताच ते सुध्दा उदभवलेल्या परिस्थितीने चिंताक्रांत झाले.आम्हाला काय माहिती आम्ही सहजच उशीर होत असल्यामुळे हा प्रश्न विचारला.आणखी दोन-चार महिने मला ओहर टाईम करावा लागेल असे संकेत आहेत.माझी हात जोडून सर्व मानव जातीस हात जोडून विनंती करतो की लाॅक डाऊन आदेशाचे 100%अनुकरण करुन कोरोना या महामारीला हद्दपार करावे.


                          ही माझी नम्र विनंती.


                                     आ.वि.


                        यमपुरीचा यमराज मृत्यूलोक                      शल्यकार.                -दत्तात्रय एमेकर गुरुजी


                  क्रांतिभुवन बहाद्दरपुरा


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel