माजी उपनगराध्यक्ष रमेशचंद्र तिवारी यांच्या पाठपुराव्याला यश
धर्माबाद (अहमद लड्डा) शहरात कोरोनाचा उद्रेक वाढला असून कोरोनाचा उद्रेक थांबविण्यासाठी तहसिलदार शिंदे व आरोग्य विभाग शर्यतीचे प्रयत्न करीत आहेत.परंतु सोमवारी 10 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.त्यापैकी 7 जण कोरोना पाझिटिव्ह असून एक निगेटिव्ह रिपोर्ट आला आहे.व उर्वरित दोन पैकी एक प्रलंबित असून एक स्वॅब नाकारण्यात आला आहे. कोरोनाची तपासणी करण्यासाठी येथील कोवीड केअर सेंटरला 500 अन्टीजेन तपासणी किट उपलब्ध झाले असून लवकरच कोरोनाचे लक्षणे असलेल्या तालुक्यातील जनतेची तपासणी करण्यात येणार असल्याचे तहसिलदार शिंदे व वैद्यकीय अधीक्षक डॉ.शेख एकबाल यांनी सांगितले आहे.
शहरातील देव्वी गल्ली येथील कामगार व वाॉटर प्लान्ट चालकाच्या संपर्कात आलेल्या नातेवाइकांसह इतर 10 जणांचे स्वॅब सोमवारी तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.त्यापैकी 7 जणांचे कोरोना रिपोर्ट पाझिटिव्ह आल्यामुळे शहरातील जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.एकूण तालुक्यात आतापर्यंत 31 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.त्यापैकी 11 जणांची प्रकृती ठणठणीत झाली आहे.शहरात कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याचे पाहून माजी उपनगराध्यक्ष रमेशचंद्र तिवारी यांनी अन्टीजेन तपासणी किट उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे केली होती.सदरील मागणीची दखल खासदार चिखलीकर यांनी घेतली.व जिल्हा शल्यचिकित्सक यांना सदरील किट उपलब्ध करून देण्याच्या सुचना दिल्या होत्या.त्यामुळे कोरोनाचे लक्षणे असलेल्या तालुक्यातील जनतेची कोरोना तपासणी करण्यासाठी येथील कोवीड केअर सेंटरला 500 अन्टीजेन तपासणी किट उपलब्ध झाले असून लवकरच कोरोनाची तपासणी मोहीम सुरू होणार असल्याचे तहसिलदार शिंदे यांनी सांगितले आहे. तसेच कोरोनाचा उद्रेक वाढत असल्यामुळे येथील कोवीड केअर सेंटर मध्ये रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कोवीड केअर सेंटर मध्ये 100 ते 110 रूग्णांचे उपचार व सोयी सुविधा मिळावे, यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.तसेच यापेक्षा जास्तीचे कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्यास त्याचेही नियोजन करून ठेवण्यात आले असल्याचे तहसिलदार शिंदे यांनी सांगितले आहे. शहरात मंगळवारी 7 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून त्यांच्या घराचे परीसर सील करण्यात आले आहे.व परीसरात जंतूनाशक फवारणी करण्यात आली आहे.तालुक्यात एकूण 31 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.तसेच मंगळवारी आणखी 3 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.येथील कोवीड केअर सेंटर मध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉ.शेख एकबाल यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मीनारायण केशटवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.वेणूगोपाल पंडीत, डॉ.प्रविण कांबळे, डॉ.पुजा आरटवाड, डॉ.नागरगोजे, डॉ.शिरगिरे व नगर परीषदेचे कार्यालयीन अधीक्षक बाबूराव केंद्रे, रूकमाजी भोगावार, सफाई विभाग प्रमुख अशोक घाटे, मंडळ अधिकारी नामदेव माळोदे, तलाठी सहदेव बासरे व नगरपरीषदेचे सर्व कर्मचारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी परीश्रम घेत आहेत.तसेच खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी माजी उपनगराध्यक्ष रमेशचंद्र तिवारी यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन 500 अन्टीजेन तपासणी किट उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे जनतेतून कौतुक होत आहे.
COMMENTS