*दशनाम युवक प्रतिष्ठाणच्या वतीने गुणवंतांचा सत्कार*


 


          *आज दिनांक 27/07/2020 रोजी दशनाम युवक प्रतिष्ठाण परभणीच्या वतीने कोरोना पार्श्वभुमीवर सोशल डिस्टन्सिंग चे नियम पाळत गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा गंगाखेड तालुक्यामध्ये राबविण्यात आला.*


         *गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याची सुरुवात गंगाखेड शहरातुन करण्यात आली.येथिल समाजबांधव श्री.सुभाष भारती सरांची कन्या कु.क्रांती सुभाष भारती हिने बारावी सायन्स मध्ये घवघवित यश संपादन केल्यामुळे तिचा प्रतिष्ठाणच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देउन गौरव करण्यात आला.*


      *याबरोबरच गंगाखेड शहरातील कु.स्वाती रामप्रभु पुरी,चि.वेदांत दशरथ गिरी,कु.सेजल दत्तात्रय परबत या विद्यार्थ्यांना प्रतिष्ठाणच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देउन गौरव करण्यात आला*


              *याप्रसंगी प्रतिष्ठाणचे मार्गदर्शक श्री.गोविंद गुलाब पुरी,प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष श्री.संदिप गिरी,प्रतिष्ठाणचे अध्यक्ष स्वप्निल भारती,प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष श्री.रामेश्वर भारती,प्रतिष्ठाणचे सचिव श्री.शाम गिरी,प्रतिष्ठाणचे कोषाध्यक्ष श्री.सुरेश पुरी,प्रतिष्ठाणचे सदस्य श्री.सिध्देश्वर गिरी, डाॅ.श्री.अशोक पुरी,श्री.महेश पुरी आदि प्रतिष्ठाणचे सदस्य उपस्थित होते*


टिप्पण्या