----------------------------
नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील आंबुलगा (बु) येथिल वय ८० वर्षे या वयस्कर व्यक्तीचा दि. २० रोजी विष्णूपुरी नांदेड येथिल शासकिय रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला .मृत्यू नंतर त्यांचा स्वॉब दि.२१ रोजी संध्याकाळी १० वाजता कोरोना पॉझिटिव्ह् आला. त्यामुळे मृत कोरोना पॉझिटिव्ह् व्यक्तिच्या संपर्कातील तसेच कुटुंबातील व्यक्तिंना क्वारंनटाईन करण्यात आले असुन संबंधित परिसर ,गाव सिल करण्यात आले आहे.
आंबुलगा (बु) येथिल ८० वर्षीय व्यक्तिचा मृत्यू नंतर अहवाल पॉझिटिव्ह् आल्यामुळे त्यांच्या संपर्कातील व्यक्तिंना क्वारंनटाईन करण्यात आले आहे.तरी कोणीही विनाकारण गावात फिरू नये.अत्यावश्यक काम असेल तरच मास्क लावून घराबाहेर यावे....
- डॉ. रमेश गवाले (तालुका आरोग्य अधिकारी मुखेड
- आंबुलगा येथिल संपुर्ण परिसर सिल करण्यात आला असुन आरोग्य विभागाच्या वतिने संपुर्ण गावातिल नागरिकांची आरोग्य तपासणी चालु आहे..तरी कोणीही विनाकारण गावातील चौकात एकत्र थांबून गर्दी करू नये.घरात थांबून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी व अफवां वर विश्वास ठेवु नये ...
- - डॉ.हाणमंते (समुदाय आरोग्य अधिकारी , उपकेंद्र आंबुलगा (बु)
आंबुलगा येथिल ८० वर्षीय वयस्कर व्यक्तिचा मृत्यूनंतर अहवाल कोरोना पॉझिटिव्ह् आला आहे.
त्यामुळे कोणीही घराच्या बाहेर पडू नका.
अतिमहत्वाचे काम असेल तरच बाहेर जाण्याची परवानगी मिळेल .मास्कशिवाय कोणीही राहणार नाही मास्क लावणे बंधनकारक असेल.
सॅनिटाईजर व साबणाचा उपयोग करावा.आरोग्याची काळजी घ्या. मर्यादित अत्यावश्यक वगळता इतर दुकान हॉटेल बंद राहतील .....
- कमलाकर गड्डीमे (सहाय्यक पोलिस निरिक्षक मुक्रमाबाद )
COMMENTS