मुंबई, दि. 19 जुलै 2020 :
सरकारच्या दुर्लक्षानंतरही डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्राने चांगली कामगिरी करत मुंबई वाचवली आहे असे गौरवोद्गार आज मुंबई भाजपाचे अध्यक्ष श्री मंगलप्रभात लोढा यांनी काढले. राज्यातील प्रमुख डॉक्टरांसोबत झालेल्या व्हिडियो कॉन्फरन्स बैठकीत ते आज बोलत होते.
यावेळी बोलतांना श्री.मंगलप्रभात लोढा यांनी वैद्यकीय कार्य करताना कोरोनाला बळी पडलेल्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. श्री. मंगलप्रभात लोढा यावेळी पुढे म्हणाले की डॉक्टरांच्या प्रश्नांची आपल्याला जाणीव असून त्या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी आणि डॉक्टरांच्या संरक्षणासाठी मुंबई भाजपा सतत प्रयत्नरत राहील. डॉक्टरांच्या कुठल्याही प्रश्नासाठी कधीही हाक मारल्यास आणि कोरोनाकाळातही काही अडचणी असल्यास आपण सतत डॉक्टरांच्या पाठी ठाम उभे राहू असे ते म्हणाले.
सरकारने पूर्ण दुर्लक्ष केल्यानंतरही डॉक्टर्स आणि कोवीड योद्ध्यांनी चांगली कामगिरी करत मुंबई वाचवली आहे, असे ते म्हणाले. या सर्व कार्यात डॉक्टरांच्या जोडीला संघ परिवारही उतरला आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला. समाजाच्या मनात डॉक्टर्स, कोविड योद्धे आणि संघ परिवार यांच्याबद्दल कृतज्ञता आहे असे ते म्हणाले. आपण सगळ्यांनी या कठिण काळात समाजाच्या सेवेत जुंपून घेतले आहे, त्याचा अभिमान वाटतो असे त्यांनी बैठकीत उपस्थित डॉक्टर्सना सांगितले.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश डॉक्टर सेलचे प्रमुख डॉ.अजीत गोपछडे व मुंबई वैद्यकीय भाजप आघाडी संयोजक डॉक्टर स्मिता रणजीत काळे यांनी आज रविवारी सायंकाळी या व्हर्चुअल बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत डॉ.स्वप्नील मंत्री, डॉ.सी.एन.पुरंदरे, डॉ लकडवाला, डॉक्टर राहूल कुलकर्णी, डॉ.गोविंद भताने,डॉ त्रिपाठी, डॉ.अशोक मेहता, डॉ पी जे कुमार ,. रेडियोग्राफर शंकर भगत , डॉ पूनम तिवारी, डॉ.जगदीश केसकर , डॉ माधुरी शाह, भिवंडी आयएमएचे सहसचिव डॉ. संदीप, डॉ. प्रीती शाहा, डॉ.राहुल शिंदे, डॉ.नंदिता माने ,फार्मसिस्ट विंग चे राकेश जैन व योगेश जोशी पॅरामेडिकल चे संजय धोत्रे यांनी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडत चर्चेत भाग घेतला. या व्हर्चुअल बैठकीत राज्यातील प्रमुख डॉक्टर्ससह विविध वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ व वैद्यकीय संघटनांचे काही पदाधिकारीही उपस्थित होते. एकुण 110 डॉक्टर्सनी या बैठकीत भाग घेतला.
डॉ.स्मीता काळे यांनी स्वागत केले तर डॉ. अजित गोपछडे यांनी बैठकीचे संचालन व आभार प्रदर्शन केले.
COMMENTS