परभणी (गणेश माळवे)
आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयाची व्याप्ती मोठी असून या विषयाचे ई कंटेंट तयार करण्यासाठी महाराष्ट्र शारीरिक शिक्षण तंत्रस्नेही पॅनलची निर्मिती होऊन शारीरिक शिक्षण व खेळ बाबींचा प्रचार-प्रसार व अभ्यासक्रम विषयक बाबींची निर्मितीसाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळेच्या माध्यमातून तयार होणारे ई कंटेंट दर्जेदार स्वरूपाचे तयार होईल. अभ्यासक्रम व खेळ बाबींच्या व्हिजुअल माहितीने विषय आणखी प्रभावी होणार असल्याने हा प्रकल्प महाराष्ट्राला दिशादर्शक ठरेल असे मत महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालयाचे प्र. संचालक जयप्रकाश दुबळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी आयोजित केलेल्या ऑनलाईन तंत्रस्नेही कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते . या समारोपास सहाय्यक संचालक सुहास पाटील उपस्थित होते.
कोवीड-19 मुळे राज्यभरातील शाळा बंद आहेत. अशा वेळी विविध संस्था, विषय संघटना, तंत्रस्नेही शिक्षकांनी तसेच शासनाच्या वतीनेही दुरस्थ शिक्षणाच्या आधुनिक वाटा हाताळत ऑनलाईन शिक्षण पद्धती दृढ करण्याचा मागील चार महिन्यात प्रयल झाला. शासनाच्या दिक्षा अॅपच्या माध्यमातून सर्व विषयांचे अध्यापन सुरु असताना शारीरिक शिक्षणाला मात्र या मध्ये शासनाच्या वतीने न्याय मिळाला नाही, म्हणून महाराष्ट्रातील तंत्रस्नेही शारीरिक शिक्षकांना एकत्र करत शारीरिक शिक्षणाचे ई कंटेंट तयार करण्या संदर्भातील राज्यस्तरीय कार्यशाळेचे नुकतेच आयोजन महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांच्या वतीने करण्यात आले होते .
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून गूगल फॉर्मच्या माहितीआधारे सहभागी झालेल्या 220 तंत्रस्नेही शिक्षकांच्या राज्य स्तरावरील तंत्रस्नेही कार्यशाळेचे मोफत आयोजन करण्यात आले होते. 15 जुलै पासून सुरु झालेल्या या कार्यशाळेत प्रा. रोहित आदलिंग व राजेंद्र कोतकर यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये ईमेल तयार करणे, गूगल फॉर्म तयार करणे, गूगल फॉर्ममध्ये क्वीझ तयार करणे, इमेज जोडणे, हिडीओ लिंक जोडणे, प्रमाणपत्र पाठविणे, ई-कंटेंट तयार करणे, पीपीटी तयार करणे, पीपीटी इफेक्ट देणे, स्मार्ट पीडीएफ तयार करणे, अभ्यासक्रमासंदर्भातील व विविध खेळ बाबींचे व्हिडीओ तयार करणेसाठी लागणारे मोबाईल व पीसी सॉफ्टवेअर व टुल्सची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली. शारीरिक शिक्षण विषयक तंत्रशुद्ध व्हिडीओंची निर्मिती कशी करावी हे विविध व्हिडीओच्या माध्यमातून दाखवून यु ट्युब चॅनल तयार करणे, व्हिडीओ अपलोड व शेअर करणे या सर्व बाबींची सखोल माहिती कार्यशाळेत रोहीत आदलिंग यांनी दिली. तयार होणारे ई-कंटेंट ऑनलाईन एज्युकेशनसाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातून राज्यभरात तंत्रस्नेही पॅनलमार्फत पाठविले जाणार आहे.
सात दिवशीय राज्यस्तर तंत्रस्नेही कार्यशाळेचा शुभारंभ भारतीय खोखो टीमचे मा. उपकप्तान व धुळे येथील तंत्रस्नेही आनंद पवार यांनी केला. या तंत्रस्नेही कार्यशाळेस अॅथलेटीक्स राष्ट्रीय तांत्रिक समितीचे अधिकारी चंद्रकांत पाटील, मुख्याध्यापक महासंघाचे जयदिप सोनखासकर, रिलायन्स फाऊडेशन स्कूलचे तंत्रस्नेही लक्ष्मण चलमले, सिलंबम व थायबॉक्सींगचे राज्य सचिव श्रीधर गायकवाड, मुंबई मनपा शारीरिक शिक्षण युनीटचे डॉ जितेंद्र लिंबकर, जळगाव येथील तंत्रस्नेही राजेश जाधव व राहुल चौधरी, सिंधुदूर्ग येथील राज्य समन्वयक दतात्रय मारकड, विभागीय अध्यक्ष दतात्रय हेगडकर, राज्य कोषाध्यक्ष घनःशाम सानप, गोंदियाचे कृष्णकांत बिसेन, राज्य तायक्वांदोचे उपाध्यक्ष अविनाश बारगजे, रत्नागिरीचे कृष्णाजी गावडे, अनिल पाटील, स्वाती चौधरी, सोनाली सूर्यवंशी, सुजाता जोशी यांचे मार्गदर्शन लाभले अशी माहिती जिल्हा अध्यक्ष बयाजी बुराण व सचिव दिनेश म्हाडगूत यांनी दिली.
कार्यशाळेच्या समारोपात महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालयाचे प्र.संचालक जयप्रकाशजी दुबळे व सहाय्यक संचालक सुहास पाटील यांनी शारीरिक शिक्षणाच्या विकासासाठी वेगळी वाट हाताळणाऱ्या महाराष्ट्र शारीरिक शिक्षण तंत्रस्नेही पॅनलचे व आयोजकांचे कौतुक करत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले . या कार्यशाळेत हेमंत मालंदकर, मोहन सनगाळे,राजेंद्र पवार, चंद्रकांत भोईटे, संदिप लंबे, भारत इंगवले,सचिन पाटील, अनंता शेळके, अनिल वाकळे, चंद्रकांत ढिकले, ललिता पाटील, पूर्वा खेरकर, महेश सुर्यवंशी, निता जाधव, संजय गायकवाड, मोहन पाटील, उमेश खंदारकर आदींसह तंत्रस्नेही शारीरिक शिक्षण शिक्षक उपस्थित होते.
फोटो:२२/७/२०२०
संचालक
जयप्रकाश दुबळे
COMMENTS