नांदेड जिल्ह्यात आज ९४ करोना बाधितांची भर; 7 व्यक्ती बरे तर एकाचा मृत्यू

    नांदेड :- जिल्ह्यात शनिवारी १८ जुलै रोजीच्या अहवालानुसार आज ९४ व्यक्ती बाधित झाले. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ६६ तर अँटीजन टेस्ट किट तप...


 


 


नांदेड :- जिल्ह्यात शनिवारी १८ जुलै रोजीच्या अहवालानुसार आज ९४ व्यक्ती बाधित झाले. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ६६ तर अँटीजन टेस्ट किट तपासणीद्वारे २८ बाधित आहेत. जिल्ह्यातील एकुण ७ व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. विष्णुनगर नांदेड येथील ६७ वर्षाच्या पुरुषाचा मृत्यू झाला आहे. सदर रुग्णास उच्च रक्तदाब, मधुमेह व श्वसनाचे आजार होते. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या ४४ एवढी झाली आहे. यात ३८ मृत्यू हे नांदेड जिल्ह्यातील असून उर्वरीत ६ मृत्यू हे इतर जिल्ह्यातील आहेत. आजच्या एकूण ३५९ अहवालापैकी २५४ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता ८६९ एवढी झाली आहे. यातील ४७६ एवढे बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आज रोजी ३४९ बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील २७ बाधितांची संख्या गंभीर स्वरुपाची आहे. यात १४ महिला व १३ पुरुषांचा समावेश आहे.


 


काल बरे झालेल्या ७ बाधितांमध्ये नायगाव कोविड केअर सेंटर येथील २, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील २ तसेच जिल्हा रुग्णालय कोविड केअर सेंटर येथील १ संदर्भीत करण्यात आलेला एका बाधिताचा यात समावेश आहे.


 


नवीन बाधितांमध्ये नांदेड शहरातील आसरानगर येथील ४४ वर्षाचा १ पुरुष, सांगवी ऑफीस कॉलनी ४६ वर्षाचा १ पुरुष, मधुबन रेसिडेन्सी येथील ४८ वर्षाचा १ पुरुष, सराफा येथील ६५ वर्षाचा १ पुरुष, देगलूर नाका येथील ५२ व ५५ वर्षाचे २ पुरुष, इतवारा येथील ७२ वर्षाचा १ पुरुष, रहेमतनगर येथील ६१ वर्षाचा १ पुरुष, जुना कौठा येथील ५० वर्षाचा १ पुरुष, जुना मोंढा येथील २७ वर्षाचा १ पुरुष, स्नेहनगर ५२ वर्षाचा १ पुरुष, सोमेश कॉलनी ३८ वर्षाचा १ पुरुष, गणराजनगर ४८ वर्षाची १ महिला, पांडुरंग नगर ३३ वर्षाचा १ पुरुष, सराफा बाजार येथील ३ व्यक्ती यात ९ वर्षाची १ महिला, २८ आणि ३६ वर्षाचे २ पुरुष, सिडको येथे ३१ वर्षाची १ महिला, हैदरबाग येथील ८४ वर्षाचा १ पुरुष व ७५ वर्षाची १ महिला, पिरबुऱ्हानगर येथील ७६ वर्षाचा १ पुरुष, सरपंच नगर येथील ५५ वर्षाचा १ पुरुष व ५० वर्षाची १ महिला, विष्णुनगर येथील ३९ वर्षाचा १ पुरुष व ६७ वर्षाची १ महिला, आदर्शनगर येथील ५३ वर्षाचा १ पुरुषा, सराफा नांदेड येथील ९, ४२, ५५ वर्षाचे ३ पुरुष व ३६ वर्षाची १ स्त्री, शिवकृपा कॉलनी येथील ७५ वर्षाची १ महिला, स्वामी विवेकानंद येथील ३८ वर्षाचा १ पुरुष, काबरानगर येथील ६५ वर्षाचा १ पुरुष, गोकुळनगर येथील ६४ वर्षाचा १ पुरुष, साईनगर येथील ६५ वर्षाचा १ पुरुष, वजिराबाद येथील ७५ वर्षाची १ महिला, फरांदेनगर येथील ३८ वर्षाचा १ पुरुष, विष्णुपुरी येथील २२ वर्षाची १ महिला, विसावानगर येथील ३७ वर्षाचा १ पुरुष, देगलूर येथील ८९ वर्षाचा १ पुरुष, उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथील ३८ वर्षाचा १ पुरुष, नाथनगर देगलूर येथील २४ वर्षाचा १ पुरुष, कंधार येथील ५० वर्षाचा १ पुरुष, बामणी मुखेड येथील २, २५, २५ वर्षाचे ३ पुरुष तर १९, २५, ४५ वर्षाच्या ३ स्त्री, मुक्रामाबाद येथील ८, ३५, ६० वर्षाचे ३ पुरुष व २९ वर्षाची १ महिला, अशोकनगर मुखेड येथील ३३ व ४३ वर्षाच्या २ महिला, किनवट येथील सिद्धार्थनगरचे ६५ वर्षाचे १ पुरुष, एसबीएम कॉलनी येथील ४८ वर्षाचा १ पुरुष, एकतानगर ४१ वर्षाचा १ पुरुष, हिप्परा ता. नायगाव येथील ६८ वर्षाचा १ पुरुष, कळमनूर येथील २६ वर्षाचा १ पुरुष, वसमत येथील ६४ वर्षाचा १ पुरुष, जिंतूर येथील ३० वर्षाची १ महिला, गंगाखेड येथील ४२ वर्षाचा १ पुरुष, धुळे येथील ५८ वर्षाचा १ पुरुष, विष्णपुरी परिसरातील २७ वर्षाची १ महिला आणि परळी येथील ६० वर्षाचा १ पुरुष यांचा समावेश आहे. नांदेड शहरातील ॲन्टीजेन टेस्ट किट तपासणीद्वारे १०८ तपासणी पैकी २८ बाधित पॉझिटिव्ह आढळून आले. त्यात प्रेमनगर येथील ६ आणि २६ वर्षाच्या २ महिला, सरपंचनगर येथील ३५ आणि ७३ वर्षाचे २ पुरुष आणि ७० वर्षाची १ महिला, प्रकाशनगर येथील २, २२, ३०, ३५, ६० वर्षाचे ५ पुरुष व ६ आणि ५० वर्षाच्या २ महिला, चैतन्यनगर येथील २७ वर्षाचा १ पुरुष, नंदनवन कॉलनी येथील १० वर्षाचा १ पुरुष, ३२ व ८ वर्षाच्या २ महिला, शक्तीनगर येथील २९ वर्षाचा १ पुरुष, सराफा येथील ३२ वर्षाचा १ पुरुष, मधुबन रेसिडेन्सी येथील ८,१६, ४० वर्षाच्या ३ महिला, विष्णुनगर येथील २२, ३२, ५२ वर्षाच्या ३ महिला, वजिराबाद येथील १८, २१, ४२ वर्षाच्या ३ महिला व १८ वर्षाचा १ पुरुष असे २८ पॉझिटिव्ह बाधित हे ॲन्टीजेन टेस्ट किट्स तपासणी प्रक्रियेद्वारे बाधित आढळले आहेत. एकुण बाधित हे ९४ आहेत.


 


जिल्ह्यात ३४९ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. त्यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ९९, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ९३, नायगाव कोविड केअर सेंटर येथे १२, जिल्हा रुग्णालय येथे १९, बिलोली कोविड केअर सेंटर येथे १२, मुदखेड कोविड केअर सेंटर येथे ५, मुखेड कोविड केअर सेंटर येथे २९, हदगाव कोविड केअर सेंटर येथे १, देगलूर कोविड केअर सेंटर येथे १८, माहूर कोविड केअर सेंटर १, गोकुंदा कोविड केअर सेंटर येथे २, लोहा कोविड केअर सेंटर येथे २, कंधार कोविड केअर सेंटर येथे २, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे ३, खाजगी रुग्णालयात ४४ बाधित व्यक्ती उपचार घेत असून ६ बाधित औरंगाबाद येथे तर निजामाबाद येथे १ बाधित संदर्भित झाले आहेत.


 


जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती


सर्वेक्षण – १ लाख ४८ हजार २०१


घेतलेले स्वॅब – ९ हजार ८२६


निगेटिव्ह स्वॅब – ७ हजार ८७३ 


आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या – ९४ 


एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती – ८६९ 


आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या – ८ 


आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या – ३ 


मृत्यू संख्या – ४४ 


रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या – ४७६ 


रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती – ३४९ 


आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या – ४०७


 


प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group