- पर्यावरण प्रेमी सौ लता बंदमवार 61 व्या वाढदिसनिम्मित अभिष्टचिंतन- पुष्पक बंदमवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला वेध
आज माझी आई सौ लता बंदमवार हीचा ६१ वा वाढदिवस त्या निमित्ताने तीची एक वेगळी बाजु मी समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हा मुलांसाठी आई म्हणजे जगातील सर्वोत्तम आई. आम्हा भावंडांवर तर तिचे विलक्षण प्रेम आहेच पण दुधापेक्षा दुधावरची साय अधिक प्रिय असते तसा तिचा तिच्या नातवंडांवर जास्त जीव आहे. तिच्या मनात प्रेमाचा अथांग महासागर आहे.
ती कुणाशीही छान संवाद साधू शकते. वयाने लहान की मोठा, हा भेद तिच्यासमोर कधीच येत नाही. समोरची व्यक्ती किती मनमिळावू आहे, ती माझ्या आईचे प्रेम - जिव्हाळा किती मिळवू शकते, तेवढा जिव्हाळा आईकडून त्यांना मिळतो. या अर्थाने ती जगन्मित्र आहे. ती निःस्वार्थ आहे. स्वतःपलिकडचे जग जपण्याची तिची नेहेमीच धडपड सुरू असते.
ती आमच्या कुटुंबाचा कणा आहे. सगळ्यांच सुखदुःखात सहभागी होते. अनुकुलता असो की प्रतिकूलता - सुखदुःख समे कृत्वा अशा भावनेने ती आयुष्य जगत असते. अशी आई नेहेमीच आपली छान मैत्रिण असते आणि मार्गदर्शकही. मीच काय,तर माझे मित्र मैत्रिणी सुद्धा तिच्या ‘फॅन’ आहेत.
आज निवृत्तीच्या वयातही ती अतिशय सक्रिय आहे. वेगवेगळ्या समाजिक उपक्रमांत ती सहभागी असते. आम्हा सगळ्यांसाठी ती आदर्श आहे. रोलमॉडेल आहे. मी आणि माझी बहीण , असे दोघेही ही आई आम्हाला दिल्याबद्दल परमेश्वराचे ऋणी आहोत.
हे परमेश्वरा, आमच्या आईला शतायुषी कर. तसेच तीच्या जीवनपटाचा व कार्यांचा माहीती देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.
सौ लता बंदमवार यांचा जन्म देवनी जिल्हा लातूर येथील श्री गोपीनाथराव व सौ कमलबाई मालशेटवार यांच्या येथे सात जुलै 1959 रोजी झाला व देवणी येथेच त्यांचे हायस्कूल पर्यंत शिक्षण झाले. 26 जून 1980 रोजी डॉ.लक्ष्मणराव बंदमवार यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले. डॉ. बंदमवार यांना नोकरीनिमित्ताने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात जावे लागले. त्या प्रत्येक विभागातील चालीरीती परंपरा व खाद्य परंपरा यांचा अभ्यास करून त्या आत्मसात केल्या. पतींच्या नोकरीनिमित्ताने त्यांना विदर्भ,मराठवाडा, कोकण, खानदेश अशा सर्व ठिकाणी खेड्यापाड्यात राहण्याचा योग व ग्रामीण जीवन अनुभवता आले.
मुळातच निसर्गाची शेतीची बागकामाची आवड असल्यामुळे जिथे जिथे राहण्याचा योग आला त्या सर्व ठिकाणी निवास्थानी परस बाग फुलवून घरच्या घरी भाजीपाला उगविला. तसेच तेथील हस्तकला, चित्रकला, शिवणकला व वेगवेगळ्या खाद्यसंस्कृती आत्मसात करून त्याचा प्रसार करण्यासाठी 1989 साली लता आर्टस ची अमरावती येथे असतांना स्थापना केली.
त्यांचे पती असिस्टंट डायरेक्टर हेल्थ या हूद्द्यावरून महाराष्ट्र शासन आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांना दोन मुले असून मोठा मुलगा पुष्पक हा एम टेक असून उद्योजक आहे त्याचा पुणे येथे स्वतःचा आयटी उद्योग आहे.
मुलगी कलिका हिने ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्स येथून कॉन्टॅक्ट लेन्स मध्ये पीएचडी केलेली आहे.
1993 साली नांदेड येथे स्थायिक झाल्यावर संपूर्ण वेळ कुटुंबासाठी मुलांच्या शिक्षणासाठी समर्पित करून मुलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रेरित केले व मुलीला देखील परदेशी शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.
कौटुंबिक जबाबदारीतून वेळ मिळाल्यावर सामाजिक दायित्व ही देखील आपली जबाबदारी आहे हे जाणून त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू केले व ते कार्य आजही चालु आहे.
विविध कार्य:-
1) प्लास्टिक मुक्ती अभियान
2) वृक्षारोपण एक झाड माझे अभियान (आनंद मित्र परिवार) व एक व्यक्ती एक झाड (वृक्ष मित्र परिवार) मध्ये सक्रिय सहभाग.
3) इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळा मागील चार वर्षात शाडू मातीपासून गणेश मूर्ती साठी जवळपास सत्तर कार्यशाळा घेऊन फक्त गणेश मूर्ती बनविण्यास नाही तर पर्यावरण पूरक इको-फ्रेंडली पद्धतीने घरच्या घरी विसर्जित करण्यासाठी प्रेरित केले तसेच निर्माल्य देखील कंपोस्ट करण्यासाठी कार्यशाळा घेतल्या.
4) सीड बॉल सोशल ग्रुप मध्ये सक्रिय सहभाग घेऊन सर्वांच्या मदतीने दोन लाख सीडबॉल बनवण्यासाठी तसेच घरोघरी बिया संकलन करून शास्त्रशुद्ध पद्धतीने सीड बॉल बनविण्यासाठी मार्गदर्शन केले व घरोघरी सीड बँक बनविण्यासाठी प्रेरित केले
5) पाणी फाउंडेशन माध्यमातून वडेपुरी व कलंबर येथे सक्रिय कार्य केले आहे.
6) 2015 साली किचन वेस्ट टेरेस गार्डन परसबाग व निरोगी जीवन या संस्थेची स्थापना केली व त्या माध्यमातून पन्नास कार्यशाळा आयोजित करुन घरोघरी स्वतःचे टेरेस गार्डन व परसबाग करण्यासाठी तसेच किचन वेस्ट चे कंपोस्टमध्ये परिवर्तन करण्यासाठी मार्गदर्शन केले त्यामाध्यमातून घरीच विषमुक्त ऑरगॅनिक भाजीपाला तयार करण्यासाठी प्रेरित केले
7) स्वच्छता अभियान
8) सुरक्षा बॉक्स वयात येणाऱ्या मुलींसाठी
9) गोदावरी स्वच्छता अभियान
10) ज्येष्ठ नागरिक संघ सक्रिय सहभाग ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न
11) वृद्धाश्रमातील निराधार व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी वेळोवेळी त्यांना भेट दिली व व आवश्यक असलेले साहित्य भेट दिले
12) दिव्यांग मूकबधिर मुलांच्या शाळेत रक्षाबंधन ब संक्रांतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केले व त्यांना मिठाई व भेटवस्तू चे वाटप केले
13) वनवासी छात्रालय येथे शैक्षणिक साहित्य वाटप केले
14) नागरी कृती समितीत सहभाग घेऊन नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्यांबद्दल माहिती संकलित करून त्यांचे तत्सम शासकीय कार्यालयातून पाठपुरावा करून निराकरण करून घेतले
15) माजी अध्यक्ष वासवी वनिता महिला मंडळ
16) तनिष्का मधुरांगण लोकमत सखी मंचच्या सक्रिय सहभाग सभासद
17) घरगुती कचरा वर्गीकरण व कंपोस्ट प्रशिक्षण शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच गृहिणींना देत आहेत
18) रोप तयार करून वाटप करून संवर्धन करण्यासाठी मार्गदर्शन केले
19) पर्यावरण पूरक इकोफ्रेंडली आकाश कंदील बनवण्यासाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित केले
20) दामिनी ग्रुप व मानसी ग्रुपमध्ये सक्रिय सहभाग
21) जिल्हा परिषद प्रा शाळा बारड व जिल्हा परिषद शाळा वाघी येथील शाळांना विद्यार्थ्यांना सहभागी करून वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन, वृक्ष संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहित केले तसेच त्यांना ट्री गार्ड भेट दिले.
सत्कार व पुरस्कार
1) "हस्तकला पुरस्कार" जिल्हा उद्योग केंद्र अमरावती ने सन 1991 मध्ये आयोजित केलेल्या अखिल भारतीय हस्तकला प्रदर्शनांमध्ये प्रथम पारितोषिक
2) "सकाळ तनिष्का गौरव" पुरस्कार जागतिक महिला दिनानिमित्त सकाळ तनिष्का तर्फे 10 मार्च 2019 रोजी पर्यावरण संबंधी कामांची दखल घेऊन प्रदान
3) "जलकन्या" पुरस्कार जिल्हाधिकारी नांदेड यांच्या तर्फे वॉटर फाउंडेशन या संस्थेच्या कामातील सहभागाबद्दल
4) "जलस्वराज्य सन्मान" पुरस्कार नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी केलेल्या कार्याबद्दल जल पुरुष डॉक्टर राजेंद्रसिंह राणा यांच्या हस्ते सत्कार व जलस्वराज्य फाउंडेशन कडून प्रदान
5) "शशिकला वासवी सेवा " पुरस्कार वासवी क्लब इंटरनॅशनल तर्फे पर्यावरण संवर्धनासाठी मानपत्र व स्मृतिचिन्ह दिनांक 26 नोव्हेंबर 2019
6) सत्कार व मानपत्र एक झाड माझे अभियान आनंद मित्र परिवार तर्फे वृक्षलागवड व संवर्धनासाठी
7) "आदर्श माता" पुरस्कार जिजामाता फाऊंडेशन'तर्फे सामाजिक परिवर्तनासाठी सक्रिय सहभागाबद्दल तसेच पर्यावरण संवर्धनासाठी 2012 चाली
8) "कुसुमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार 20 " महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मीमांसा फाउंडेशन ह्युमन राईट फाउंडेशन दैनिक समीक्षा व मंथन क्रिएटिव्ह ग्रुप 8 मार्च 2020 रोजी पर्यावरण संबंधी कार्याबद्दल प्रदान करण्यात आला.
9) "गौरव सोहळा" पुरस्कार ओंकार फाऊंडेशन' तर्फे पर्यावरण संवर्धनासाठी 25 मार्च 2019
10) वासवी वनिता महिला मंडळ फरांदे नगर तर्फे सत्कार व मानचिन्ह
11) "गौरव पुरस्कार" अंबिका योग कुटीर तर्फे 2005 रोजी पर्यावरण संवर्धन व योग प्रसारासाठी
12) "गौरव पुरस्कार" भाऊचा डबा 13 एप्रिल 2008 रोजी पर्यावरण संवर्धन व अन्नदानासाठी. अश्या समाज सेविकेच्या पोटी मी जन्म घेतला धन्य झालो.तुझे आशीर्वाद आम्हा सगळ्यांना मिळत राहोत
.
COMMENTS