पेन्शन वाचवण्यासाठी
शिक्षक भारतीचे आवाहन
2 लाख हरकती नोंदवणार
अधिसूचनेवरील आक्षेपाचा नमुना
प्रति
मा. अप्पर मुख्य सचिव
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय विस्तार, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक
मुंबई - 32.
विषय - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी ( सेवेच्या शर्ती ) नियमावली 1981 मधील मसुद्यात सुचविलेली दुरुस्ती याबाबत हरकत घेत असले बाबत.
संदर्भ - आपल्या विभागाने प्रसिद्ध केलेला मसुदा दि 10 जुलै 2020.
महोदया,
महाराष्ट्रातील खाजगी शाळांतील कर्मचाऱ्यांच्या सेवेसंदर्भात महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मधील नियम 2 पोटनियम (1) चा खंड (ब) मधील अनुदानित शाळेची व्याख्या बदलण्यात येत आहे. माझा त्यावर आक्षेप आहे. तसेच निवृत्ती वेतनाबाबत असलेल्या मुख्य नियमातील नियम क्रमांक 19 व नियम 20 यामध्ये दि 10 जुलै 2020 च्या प्रसिद्ध केलेल्या मसुद्याद्वारे दुरुस्ती सुचविण्यात आली आहे. सदर अन्यायकारक दुरुस्तीला व पूर्ण मसुद्याला माझा पूर्णपणे आक्षेप व विरोध आहे. हा आक्षेप या पत्राद्वारे हरकत म्हणून नोंदवित आहे.
या मजकुराऐवजी
*राज्यातील शासन मान्यता प्राप्त विनाअनुदानित व अंशतः अनुदानित व अनुदानित अशा शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन अधिनियम 1982 मधील तरतुदी लागू करण्यात येतील*
असा बदल मी सुचवित आहे.
तरी 10 जुलै 2020 चा मसूदा पूर्णपणे रद्दबातल करण्यात यावा.
सर्व कर्मचारी वर्गाला जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी, अशी मागणी मी करत आहे.
कळावे.
आपला,
सही/--
( नाव )
---------------
* विशेष सूचना :
वर आक्षेपाचा नमुना दिला आहे. 10 जुलै 2020 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेतील बदलावर दिनांक 11 ऑगस्ट 2020 पूर्वी लेखी विरोध नोंदवायचा आहे. 11 ऑगस्ट पूर्वी आपला लेखी विरोध मंत्रालयात नोंदवला गेला पाहिजे याची काळजी घ्यावी.
अप्पर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा, मंत्रालय विस्तार, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई 400032.
या पत्यावर राज्यातील प्रत्येक शिक्षक, शिक्षकेतर यांनी सामूहिक न देता वैयक्तिक लेखी आक्षेप नोंदवावा आणि वरील पत्यावर कुरियरने अथवा पोस्टाने पाठवा. तसेच acs.schedu@maharashtra.gov.in या ईमेल आयडी वर ईमेलने पाठवा.
आपले स्नेहांकित
◆ अशोक बेलसरे, अध्यक्ष.
◆ सुभाष मोरे, कार्याध्यक्ष.
◆ संजय वेतुरेकर, जालिंदर सरोदे, प्रमुख कार्यवाह.
◆ प्रकाश शेळके, कार्यवाह.
◆ संगिता पाटील, महिला आघाडी अध्यक्षा.
◆ आर. बी. पाटील, अध्यक्ष, ज्युनिअर कॉलेज युनिट, महाराष्ट्र.
◆ मुश्ताक पटेल, अध्यक्ष, उर्दू विभाग, महाराष्ट्र.
◆ धनाजी पाटील, उपाध्यक्ष.
https://www.facebook.com/shikshak.bharati/
COMMENTS