कोविड -19 चे नियम पाळून मुस्लिम समाजाने बकरी ईद शांततेत साजरी करावी-पो.नि. सुरेश बुधवंत.  


माजलगाव/भास्कर गिरी


जगात कोविड-19 चे संकट घोंगावत आहे.सामाजिक अंतरासह या स्थितीत मुस्लिम समाजाने आपापल्या घरी नमाज पठण करून कोविड-19 चे नियम पाळून शांततेत बकरी ईद साजरी करावी असे आव्हान माजलगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी केले.


 


बकरी ईद निमित्त माजलगाव शहर पोलिस ठाण्यात सामाजिक अंतराचे नियम शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती.


या बैठकीला संबोधित करताना सुरेश बुधवंत म्हणाले कि.कोव्हीड महामारीच्या काळात नियम पाळून या आजाराचा आपल्याला मुकाबला करायचा आहे.त्यामुळे मुस्लीम समाजाने सामुदायिक नमाज पठण न करता आपापल्या घरी नमाज आदा करावी.आपली सुरक्षा ही आपलीच जबाबदारी असून सर्वांनीच ही खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. असेही ते यावेळी म्हणाले.यावेळी मुस्लिम समाजातील युवकांनी आपले मनोगत व्यक्त केले.बैठकीला एपीआय अविनाश राठोड,पीएसआय विजय थोटे,यांची उपस्थिती होती. दरम्यान सकाळी 11 वाजता पोलिस दलाच्या वतीने सामाजिक आंतर ठेवत शहरात पथ संचलन करण्यात आले.


टिप्पण्या