माजलगांव :प्रतिनिधी
गेल्या तीस वर्षापासून पत्रिकारितेच्या क्षेत्रात यशस्वीरित्या कामगिरी करणारे, सामाजिक, राजकीय, सहकार क्षेत्रातील जाणकार व्यक्तीमत्व म्हणून ख्याती असलेले, माजलगांव येथील जेष्ठ समाजसेवक रामानंद लड्डा यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी समितीच्या मीडिया सेल प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष श्रीकिशनजी भन्साळी यांनी रामानंद लड्डा यांची या पदावर नियुक्ती केली. त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून रामानंदजींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यापूर्वीही रामानंद लड्डा यांनी माहेश्वरी सभेचे राष्ट्रीय स्तरावर काम केले असून एकुणच त्यांच्या सामाजिक कामाचा आवाका फार व्यापक आहे.
रामानंद लड्डा गेल्या तीस वर्षापासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. गंगोत्रीमाया या दैनिकासह ते केवळ माहेश्वरी समाजासाठीच साप्ताहिक भारतीय माहेश्वरी भूूषण नावाचे साप्ताहिक गेल्या 3 वर्षापासून चालवत आहेत. अतिशय परखड, सत्याची पाठराखन करणारा आणि अन्यायाविरूध्द प्रखरतेने लढा देणारा पत्रकार म्हणून या क्षेत्रात काम करणार्या तरूणांचे ते प्रेरणास्थान आहेत. इंडस्ट्रीयल को ऑप इस्टेट,माजलगांवचे चेअरमन, संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष, मराठी पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष, माहेश्वरी शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक सचिव, माहेश्वरी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक आदी पदे भूषविलेल्या रामानंदजींनी अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे सदस्य तसेच महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे सदस्य म्हणून देखील सामाजिक कामात मोठे योगदान दिलेले आहे. या शिवाय भारत संचार निगम च्या बीड जिल्हा सल्लागार पदावर ते ६ वर्षे कार्यरत होते. माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.
त्यांच्या एकुणच सामाजिक,राजकीय,शैक्षणिक, सहकार आणि पत्रकारितेतील अनुभव लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष श्रीकिशनजी भन्साळी यांनी रामानंद लड्डा यांची या पदावर नियुक्ती केली. रामानंद लड्डा यांच्या या नियुक्तीमुळे समाजात घडणार्या घडामोडींची, सामाजिक कार्याची माहिती समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत निश्चीतच पोहोंचेल असा विश्वासही भन्साळी यांनी व्यक्त केला. रामानंद लड्डा यांच्या नियुक्तीमुळे माजलगांव परिसरातील माहेश्वरी समाजात चैतन्याचे वातावरण पसरले असून माहेश्वरी समाजासह सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रामानंद लड्डा यांची महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी समितीच्या मीडिया सेल प्रमुखपदी निवड झाल्याचे वृत्त समाजताच बीड माहेश्वरी जिल्हा अध्यक्ष सिए गोपाल कासट,सचिव संतोष सोहनी , गोविंद बजाज, नंदकिशोर तोतला ,दत्तप्रसाद तोतला ,रमेश कासट ,के डी वर्मा या सह वरिष्ठ समाजसेवी बंधूभिनीनी अभिनंदन केले . त्यांच्या मित्रवर्गातूून सय्यद मुसद्दीक बाबा, प्रा. डॉ. कमलकिशोर लड्डा, डॉ.प्रकाश खोडसकर, सतिश दुगड, परमेश्वर लांडगे, प्रभाकर शेटे,ह नुमंत डोईजड ,अरुण राउत , संतोष जेथलिया आदींनी रामानंद लड्डा यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करीत पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
COMMENTS