नांदेड /लातूर ____ग्लोबल मराठवाडा
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच मृत्यू होण्याचे प्रमाणही आता वाढू लागले आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास २ जणांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात मृत्यू झालेल्याची संख्या १३ वर पोहचली आहे.
उमरखेड येथील ७४ वर्षीय इसम विष्णूपुरी येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार घेत होता. त्यांचा गुरूवारी मध्यरात्री मृत्यू झाला.
तर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास शहरातील बरकतपूरा येथील ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तसेच १३९ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे.
कोरोनाच्या रुग्ण संख्येत आता झपाट्याने वाढ होत असल्याने नागरिकांना खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.*लातूरात दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू!*
लातूर
जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रर्दुभाव दिवसेंदिवस वाढत असून गुरुवारी रात्री दहा वाजता एकाचा तर शुक्रवारच्या मध्यरात्री एक अशा दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाने मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आठ झाली आहे.
येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील रुग्णालयात दि.6 जून रोजी औसा तालुक्यातील एक स्त्री रुग्ण मुंबईवरुन प्रवास करुन आली होती.तीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले होते. तिचा उपचारादरम्यान दि. 11 रोजी रात्री दहाच्या दरम्यान मृत्यू झाला.
तर दुसरा एक रुग्ण गंभीर अवस्थेत दाखल झाला होता. या रुग्णास पुर्वीपासुनच मधुमेह, उच्च रक्तदाब व ह्दयविकाराचा आजार होता. पाच वर्षापुर्वी त्यांचे बायपासचे ऑपरेशन झाले होते.
सदर रुग्ण दाखल झाल्यापासुन व्हेंटीलेटर वर होता त्यांचा उपचारादरम्यान दि. 12 रोजी (मध्यरात्री एक वाजेच्या दरम्यान) मृत्यु झाल्याची माहिती माहिती डॉ. राजेश बोबडे, डॉ. किरण डावळे, डॉ. राम मुंढे, डॉ. मारुती कराळे व प्राध्यापक व विभागप्रमुख औषधवैद्यकशास्त्र विभाग डॉ. निलिमा देशपांडे यांनी दिली.
COMMENTS