--बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करा
सेलू(प्रतिनिधी)दि 29
बोगस बियाणांमुळे शेतकरी आधीच त्रस्त असतांना युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांची लूट चालविली आहे.या युरिया खताची टंचाई दूर करण्याची मागणी दबाव गटाच्या वतीने आज उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बोगस बियाणांमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत.बियाणे विक्रेते आणि बीज कंपन्यांनी संगनमताने सोयाबीनचे बोगस बियाणे कट करून शेतकऱ्यांच्या माथी मारले.त्या बियाणांची उगवण न झाल्याने तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.यामध्ये बियाणे कंपन्या व विक्रेते यांचे शेतकऱ्यांना फसविण्याचे मोठे षडयंत्र आहे.त्याचीही सखोल चौकशी करून सदरील कंपन्या व विक्रेत्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दुबार पेरणी बरोबरच शेतकऱ्यांना युरिया खत देखील मिळत नाही.ज्या खतामध्ये जास्त फायदा आहे तेच खत दुकानदार विकत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.युरिया उपलब्ध असतांना शेतकऱ्यांना मिळत नाही.कृषी विभाग देखील या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.यामुळे युरियाचा कृत्रिम टंचाई दूर करून बोगस बियाणे देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर दबाव गटाचे निमंत्रक ऍड.श्रीकांत वाईकर,ओमप्रकाश चव्हाळ,विलास रोडगे,सतीश काकडे,इसाक पटेल,रामचंद्र आघाव,ऍड.देवराव दळवे,ऍड.शिवाजी चौरे,गुलाबराव पौळ,लक्ष्मण प्रधान,मधुकर सोळंके,राजेंद्र केवारे,शिवाजी खेडकर,पंकज सोनी,डॉ.गणेश थोरे,दिलीप शेवाळे,अजित मंडलिक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
COMMENTS