माजलगाव दि.६ (प्रतिनिधी)
येथील बीड रोडवरील मोक्याच्या ठिकाणी डॉ आनंद राठी यांच्या जागेत महालक्ष्मी ट्रेडर्स हे टाईल्स चे भव्य दालन असून या दुकानदारांस लॉक डाऊन काळातील 2 महिन्यांचा किराया माफ करून डॉ आनंद राठी यांनी एक आदर्श निर्माण केला आहे .
बीड रोडवरील आज किराया गगनाला भिडला असून सरासरी एका दुकानाला 15- 20 हजार रु पर्यंत चा किराया या रोडवर आहे.डॉ आनंद राठी यांनी सुमारे 25 बाय 100 या भव्य दलनाचा किराया माफ करून एक आदर्श निर्माण केला आहे.या पूर्वी जगदीश साखरे ,कालिदास होके,माजी आ मोहनराव सोळंके, जीवन जगताप,संजय बजाज यांनी ही आपल्या कॉम्प्लेक्स मधील व्यापारी लोकांचा किराया माफ केला होता एक महिन्याचा संपूर्ण किराया माफ करून भाडेकरूंना लॉक डाऊन काळात फार मोठी मदत केली. डॉ आनंद राठी यांच्या या निर्णयाचे सर्व व्यापारी वर्गातुन अभिनंदन होत आहे .
COMMENTS