रेशन कार्ड घेऊन या मोफत उपचाराचा लाभ घ्या - डॉ.यशवंत राजेभोसले
माजलगाव/प्रतिनिधी
शासनाच्या जीवनदायी योजनेअंतर्गत यशवंत हॉस्पिटल येते सर्वच रेशन कार्ड धारकांसाठी विविध आजारांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी रेशन कार्ड दाखवून मोफत उपचाराचा लाभ घेण्याचे आव्हान डॉ.यशवंत राजेभोसले यांनी केली आहे.
शासनाच्या जीवनदायी योजनेअंतर्गत पूर्वी शासकीय हॉस्पिटल मध्ये 138 विविध आजारांवर उपचार केले जात होते.हाच लाभ आता येथील सर्व सुविधायुक्त यशवंत हॉस्पिटल येथे नागरिकांसाठी सुरु करण्यात आला आहे.सर्वच शिधापत्रिका धारकांसाठी योजना सुरू करण्यात आली आहे.यात स्त्री रोग्यांसाठी मोफत प्रसूति,सिजर,गर्भ पिशव्यांचे आजार,त्याचप्रमाणे प्रमाणे सर्जरी साठी हर्निया,मुळव्याध,भगंदर, फिशर, इत्यादी विविध आजारांवर तज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार करण्यात येणार आहेत.त्यामुळे नागरिकांनी रेशन कार्ड घेऊन यावे आणि या विविध आजारांवर मोफत उपचाराचा लाभ घ्यावा असे आव्हान यशवंत हॉस्पिटल चे संस्थापक डॉ.यशवंत राजेभोसले, स्त्री रोग तज्ञ डॉ.प्रियंका राजेभोसले, सर्जन डॉ.युवराज कोल्हे,डॉ.अशोक गायकवाड,श्रीराम राणे, डॉ.आगलावे.यांनी केले आहे.
COMMENTS