त्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या समर्थनात
पोलिस अधिक्षकांना निवेदन
देवणी ः बुधवारी लाच घेताना पकडलेल्या देवणी तालुक्यातील त्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या समर्थनात शुक्रवारी तालुक्यातील नागरिकांच्या वतीने पीलिस अधिक्षक लातुर यांना निवेदन देण्यात आले .यावेळी पोलिस अधिक्षकांना पोलिस कर्मचाऱ्यांविषयी असलेली सहानुभुती कथन करत एरव्ही पोलिसावर संकट आले तर आनंद माननारी जनता आज पोलिसावर ओढावलेल्या पोलिसाबद्दल हळहळ व्यक्त करताना दिसुन आली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,पोलिस कर्मचारी मुरलीधर दंतराव हे कर्तव्यनिष्ठ कर्मचारी असुन यांच्या कार्यकालात अनेक प्रकरणे समोपचाराने मिटल्याने गुन्ह्याचे प्रमाण घटले आहे.शेतीच्या कारणावरुन दरेवाडी व चवणहिप्परगा येथील नागरिकांचे भांडण व मारामारी झाली होती.कोरोनाची पार्श्वभूमीवर सदर प्रकरण गावातील पंचाच्या मदतीने आपआपसात मिटवले होते.या प्रकरणात जखमी झालेल्या व्यक्तीस मारहाण करणाऱ्याकडुन दवाखान्याच्या उपचारासाठी १० हजार देण्याचे पंचासमक्ष ठरले होते.ही रक्कम जखमीला पोलिसांनीच द्यावी. माझे त्याच्याशी बोलणे नाही म्हणुन बळजबरीने ती रक्कम पोलिस नाईक मुरलीधर दंतराव यांना तक्रारदाराने देण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.सदर भांडण प्रकरणातील व्यक्ती ,प्रकरण मिटवणारे पंच यांचे जवाब घेवुन चौकशी करावी.व लाचप्रकरणातील पोलिस कृर्मचारी यांच्या गुन्ह्याच्या चौकशीत सहानुभूती पुर्वक न्याय द्यावाअशी मागणी निवेदन कर्त्यानी केली आहे.
निवेदनावर सरपंच प्रा.महेमुद सौदागर ,तुकाराम पाटील ,राम भंडारे,तानाजी पाटील ,दत्ता डुबे ,मालबा घोणसे ,मालु हणमंते ,मंहमदरफी सय्यद ,हसन शेख ,सगीर मोमीन ,कुमार पाटील ,रामलिंग शेरे ,बालाजी भोसले,,बाळासाहेब बिरादार ,सुनिल हुडे ,अनिल बरगाले ,आदीसह वलांडी पंचक्रोशीतील नागरिकांच्या सह्या आहेत.
पोलिसाच्या संकटकाळी धावले नागरिक...
हल्लीच्या काळात पोलिसाकडे कटाक्ष नजरेने पाहणारी जनता पोलिसावर ओढावलेल्या संकटात सहानुभुती दाखवण्यासाठी ,व्यापारी ,लोकप्रतिनिधी ,नोकरदार ,समाजसेवक , पत्रकार व नागरिक पोलिस अधिक्षक कार्यालय गाठुन पोलिसासाठी प्रेम व्यक्त करणारी घटना पहिलीच असल्याचे एस.पी.कार्यालय परिसरात सुरु होती.
COMMENTS