राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा - प्रदीप सोळुंके
माजलगाव/भास्कर गिरी
ज्या कार्येकर्त्यांनी पक्षाच्या उभारणीसाठी योगदान दिले आहे त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानात लाखोंच्या संख्येने उपस्थित होण्याचे आवाहन राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते प्र. विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रमेश सोळंके यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.
प्रदीप सोळुंके पुढे बोलतांना म्हणाले की, दि. 10 जून 2020 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापननेस 21 वर्षे पूर्ण झाली असुन यावर्षी कोरोना व चक्रीवादळा मुळे पक्षाचा वर्धापनदिन साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले व त्यानुसार हे वर्षे लोकसेवेसाठी अर्पण करण्याचा संकल्प कार्येकर्त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष लोकशाही, सामाजिक न्याय, पुरोगामी विचारांचा प्रबळ समर्थक असल्यामुळे या पक्षच्या स्थापन नंतर जनमतामुळे अवघ्या आठ महिन्यात या पक्षास राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त झाला आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या सारख्या अनुभवी, राजकीय मुत्सुदीपणा मुळे 21 वर्षात पक्ष चार वेळा सतेत आला आहे. म्हणून महाराष्ट्र राज्यात प्रत्येक तालुक्यात किमान 1000 अभिप्राय मिळणे अपेक्षित आहे त्यानुसार 358 तालुक्यात 358000 अभिप्राय पक्षाला मिळणार आहेत त्यामुळे कार्यकर्त्यापर्येंत पोहचण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष ठरणार आहे राष्ट्रवादी पक्षाने एक लिंक तयार केली आहे ती लिंक ओपन करून अत्यंत सोप्या भाषेत फॉर्म भरून सेंड करणे आहे त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो पक्ष कार्येकर्त्यांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्राचे ख्यातनाम वक्ते प्रदीप साळुंके यांनी केले आहे. यावेळी पत्रकार परिषेदेला विश्वाम्भर थावरे, विजयशिंह भीमराव सोळंके, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रामेश सोळंके, लखन थावरे, ऍड संभाजी होके उपस्थित होते.
COMMENTS