सर्व गटशिक्षणाधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख
आज दिवसभरात शिक्षक व मुख्याध्यापक यांच्याकडून वारंवार उद्या पासून शाळा सुरू करणे बाबत विचारणा होत होती काही ठिकाणी शिक्षकांना उद्या कंपल्सरी उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या असल्याचे फोन आज मला आलेले आहेत. मी आपणास स्पष्ट करू इच्छितो की शासनाच्या निर्देशानुसार शाळा सुरू करण्याबाबत कोणतीही सूचना नाही. शाळा बंद ठेवण्याचे शासनाच्या सूचना मध्ये नमूद आहे. शाळा सुरू करायच्या असतील तेव्हा शासनस्तरावरुन सविस्तर मार्गदर्शक सूचना प्राप्त होतील. त्यामुळे कोणत्याही शिक्षकाला तसेच विद्यार्थ्याला उद्या शाळेमध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना या स्तरावरून देण्यात आलेल्या नाहीत. करोना संदर्भातील निर्देशांचे पालन करून शाळा साफसफाई, निर्जंतुकीकरण अथवा पुस्तक वाटप याबाबत आपण शालेय व्यवस्थापन समितीची चर्चा करून नियोजन करू शकता परंतु सर्वांनीच शाळेवर उपस्थित राहावे असा मात्र याचा अर्थ होत नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
शिक्षणाधिकारी प्राथमिक
जिल्हा परिषद नांदेड
COMMENTS