दि.२३.जुन रोजी भाजपा शिक्षक आघाडी मराठवाडा विभाग स्तरीय बैठक व्हीडिओ कान्फरंसद्वारे घेण्यात आली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याच्या भाजपा शिक्षक आघाडी च्या संयोजक प्रा.कल्पनाताई पांडे ह्या होत्या.प्रथम मराठवाडा विभागातील सर्व जिल्हा संयोजकांनी आपापल्या जील्ह्याचा अहवाल सादर केला. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या संयोजकांनी तालुका पातळीपर्यंत संयोजकांची नेमणूक करून संघटन मजबूत करण्याचे काम युद्धपातळीवर चालू असल्याचे सांगितले. उस्मानाबाद जिल्ह्याचे संयोजक विनोद राठोड यांनी आमदार राणा जगजीत सिंग पाटील यांच्या सहकार्याने उस्मानाबाद जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात नजीकच्या काळात जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध वैयक्तिक व सामायिक समस्यांच्या निराकरणासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयात सहविचार सभा घेणार असल्याचे सांगितले. लातूर जिल्ह्याचे निवेदन जिल्हा संयोजक श्री नागनाथ खिंडे यांनी केले.बीड जिल्ह्याचे संयोजक बन्सी हावळे यांनी जिल्ह्यात शिक्षण वाचवा आंदोलन यशस्वी केल्याचे सांगितले. परभणी जिल्हा संयोजक श्री अरुण वडकर सर यांनी मेघनाताई बोर्डीकर यांच्यासमवेत शिक्षणाधिकारी कार्यालयात सहविचार सभा घेऊन परभणी जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे सूतोवाच केले.नांदेड जिल्हा संयोजक हावगी राव गोछडे यांनी नांदेड जिल्ह्यातील ोळा तालुक्यांच्या नियोजनासाठी सहसंयोजक नेमणल्याचे सांगितले.हिंगोली जिल्हा अहवाल प्राध्यापक तुळजा दास देशपांडे यांनी सादर केला. संभाजीनगर ग्रामीण चा अहवाल श्री अनिल मोरे यांनी सादर केला. संभाजीनगर महानगराचा अहवाल सादर करत असताना श्री योगेश जगताप यांनी मराठवाड्यातील विनाअनुदानित, इंग्रजी माध्यमांच्या सीबीएससी च्या शाळांमध्ये हे संस्थाचालक शिक्षकांना पगार देत नसल्याचे सांगितले. यावर मराठवाडा विभाग संयोजक प्राध्यापक नितीन कुलकर्णी यांनी या विषयावर विभागस्तरीय आंदोलन घेऊन सदरील प्रश्नाचा पाठपुरावा करण्याचे सुचवले व तशी कृती करण्याचे बैठकीत ठरले. मराठवाडा विभागाचे सहसंयोजक श्री रामचंद्र भोसले यांनी जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे यावर भर दिला. विभाग सहसंयोजक श्री विजेंद्र चौधरी यांनी शिक्षकांच्या वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी च्या प्रश्न संबंधात यथोचित मार्गदर्शन केले. महिलांच्या विभाग पातळीवरील संघटना साठी प्रयत्नरत असल्याचे महिला आघाडी विभाग सहसंयोजक सो ज्योतीताई तुपे यांनी सांगितले. बैठकीत उपस्थित असलेले राज्याचे सहसंयोजक श्री विकास पाटील यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.
मराठवाडा विभागाचे संयोजक प्राध्यापक नितीन कुलकर्णी यांनी मराठवाडा विभाग स्तरावर दोन आंदोलनाची उद्घोषणा केली. कायम अनुदानित तत्वाच्या शाळांवर काम करणाऱ्या शिक्षकांना नियमित वेतन मिळवून देण्यासाठी शिक्षणाधिकारी स्तरावर तसेच शिक्षण उपसंचालक स्तरावर शिक्षक संस्थाचालक व अधिकारी वर्ग यांची सहविचार सभा लावून प्रश्न समन्वयाने सोडवण्याचा कृती कार्यक्रम जाहीर केला. जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी यासाठीसुद्धा मराठवाडाभर भाजपा शिक्षक आघाडीच्या माध्यमातून आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचे ठरले. लॉकडाउनच्या नंतर शिक्षणामध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत याविषयी सर्व जिल्हा युनिट्सनी लेखी स्वरूपात प्रस्ताव दाखल करावेत व सर्व संकलित माहितीच्या आधारे राज्यस्तरीय व्हिजन डॉक्युमेंट राज्य शासनाला सकारात्मक निर्णय घेण्यासाठी सादर करण्यात येणार असल्याचे मराठवाडा विभाग संयोजक श्री नितीन कुलकर्णी यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोपात राज्याच्या संयोजक आदरणीय कल्पनाताई पांडे यांनी सर्व जिल्हा युनिटनी भाजपा जिल्हाध्यक्षांशी समन्वय ठेवून पक्षाच्या सर्व कार्यक्रमात सहभाग नोंदवून पक्षाच्या ध्येय धोरणानुसार कृती कार्यक्रम आखावा व व्हिजन डॉक्युमेंट संकलित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे सांगितले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लॉक डाऊन च्या कालावधीत मराठवाडा विभागात प्रथमच बैठक घेत असल्याचे सांगून मराठवाड्यातील संघटन चांगले मूर्त स्वरूपात आलेले आहे. तालुका स्तरापर्यंत संघटन वाढवण्यासाठी सर्वांनी श्री नितीन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली टीम वर्क करत प्रयत्न करावेत असेही कल्पनाताई यांनी सांगितले. मराठवाडा विभागाचे संयोजक नितीन कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले व सदरील बैठक संपन्न झाली
COMMENTS