मंजरथ येथील दशक्रिया विधी चालू करा - रमेशराव आडसकर
माजलगाव (प्रतिनिधी)
तालुक्यातील तीर्थ क्षेत्र असलेल्या मंजरथ येथे गोदावरी गंगेच्या तीरावर हिंदू धर्मातील पवित्र दशक्रिया विधी केला जातो जिल्हा भरातुन अनेक कुटुंब या ठिकाणी विधी करण्यास येतात परंतु विधी हा हिंदू धर्मात श्रेष्ठ विधी असून कोरोना महामारी मुळे गेली 3 महिन्या पासून मंजरथ येथे दशक्रिया विधी करण्यास बंदी आहे. हा दशक्रिया विधी करता येत नल्यामुळे मृत व्यक्तींचे नातेवाईक दुःखी आहेत. या दशक्रिया विधी वर अनेक समाजातील कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने त्यांच्यावर आज मितीस उपास मारीची वेळ आली आहे. त्यांच्या हाताला दुसरे कामही नाही.
प्रशासनाच्या नियमानुसार सामाजिक अंतर ठेऊन तीन ते पाच व्यक्तींना प्रवेश देऊन विधी गोदावरी घाटावर पूर्वरीत चालू करावा अशी मागणी माजलगाव विधासभा मतदारसंघाचे भाजप नेते रमेशराव आडसकर यांनी आज दि. 18 जून रोजी माजलगाव तहसीलदार कार्यालयात तहसीलदार यांच्याकडे निवेदना द्वारे केली .यावेळी माजी नगरध्यक्ष डॉ अशोकराव तिडके, डॉ भगवानराव सरवदे, भाजपा तालुकाध्यक्ष अरुण राऊत, डॉ मनोज फरके, दत्ता महाजन विजय रांजवण, सदाशिव पाठक, कैलास इके, प्रमोद जोशी, मंगेश उपाध्ये यांच्यासह आदी भाजप कार्येकर्ते उपस्थित होते .
COMMENTS