🔴?*
🔴 लडाखमध्ये 20 भारतीय जवानांचे प्राण घेणाऱ्या चीनने पुन्हा एकदा भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. शांततेच्या मार्गातून प्रश्न सोडवण्याचा आव आणणाऱ्या चीनने भारताला अप्रत्यक्षपणे हायड्रोजन बॉम्बची धमकी दिली आहे.
🔴 *इशारा* : चीनचे मुखपत्र असणाऱ्या ग्लोबल टाइम्सने एका ट्विटद्वारे भारताला इशारा दिला आहे. चीनने 1967 मध्ये हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली होती. त्याचाच व्हिडिओ ग्लोबल टाइम्सने शेअर केला आहे. हायड्रोजन बॉम्ब हा आत्मसंरक्षणेसाठी असून आमचा देश पहिल्यांदाच अण्वस्त्रांचा वापर करणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.
🔴 *बॉम्बची चाचणी* : आजच्याच दिवशी 1967 मध्ये चीनने आपल्या पहिल्या हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केली होती. चीनने आत्मरक्षणासाठी अणवस्त्र कार्यक्रमावर काम केले असून पहिल्यांदा अण्वस्त्रांचा वापर करणार नसल्याचे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.
🔴 *चर्चा* : भारत आणि अमेरिकेसोबत चीनचे संबंध तणावपूर्ण असतानाच हा व्हिडिओ पोस्ट झाल्याने त्याची चर्चा सुरू आहे. चीनने एकप्रकारे भारत आणि अमेरिकेला धमकावण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
🔴 *दावा* : अण्वस्त्रांवर देखरेख ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेनेदेखील चीन आपल्या अण्वस्त्र साठ्यांमध्ये वाढ करत असल्याचे म्हटले आहे. चीनकडे सध्या 3 हजार 200 अणुबॉम्ब असल्याचा दावा केला जात आहे.
COMMENTS