नवीन २ व्यक्ती बाधित; कोरोनातून ४ व्यक्ती मुक्त
नांदेड :- कोरोना आजारातून आज पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील ४ बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३६७ बाधितांपैकी एकूण २७९ व्यक्ती कोरोनातून बरे झाले. रविवार २८ जून रोजी सायं ५ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण ११४ अहवालापैकी ७९ अहवाल निगेटिव्ह तर १८ नवीन बाधित व्यक्ती आढळले.
नवीन बाधितांमध्ये विष्णपुरी येथील सहा महिला रुग्ण वय वर्षे अनुक्रमे ५, ५, २५, २९, ४५, ५७ व तीन पुरुष वय वर्षे अनुक्रमे ६, १९, ३५ आहेत. खुबा मस्जित – सिडको नांदेड येथील वयवर्षे ४३ ची एक महिला व दोन पुरुष वय वर्षे २४, ५० चे आहेत. पिरबुऱ्हानगर येथील ४ वर्षाचे १ बालक, आंबेडकर नगर येथील ५५ वय वर्षे असलेला एक पुरुष, ४१ वर्षे वयाचा गवळीपूरा येथील एक पुरुष, चैतन्यनगर येथील ४८ वर्षे वयाचा एक पुरुष तसेच गॅस गोडाऊन, लोहा येथील ३० वर्षाचा १ पुरुष, बळेगाव तालुका देगलूर येथील २१ वर्षे वयाचा एक पुरुष यांचा समावेश आहे. या सर्व बाधित व्यक्तींची प्रकृती स्थिर आहे.
काल रविवारी दोन रुग्ण वाढले परवा रात्री आलेल्या १६ जणांच्या अहवालात आज सायंकाळपर्यंत दोन रुग्णांची भर पडली आहे. ते म्हणजे आंबेडकर नगर येथील ५५ वय वर्षे असलेला एक पुरुष आणि लोहा येथील गॅस गोडाऊन जवळ राहणारा ३० वर्षाचा १ पुरुष,
७२ बाधितांवर औषधोपचार चालू असून यातील ६ बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात वय ५० व ५५ वर्षाच्या दोन महिला बाधित व ३८, ४२, ६७ व ७५ वय वर्षाचे ४ बाधित पुरुषांचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यात ७२ बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी, नांदेड येथे १६, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ४६, मुखेड कोविड केअर सेंटर येथे १ बाधित व्यक्ती, देगलूर कोविड सेंटर येथे १ व्यक्ती उपचार घेत असून ७ बाधित औरंगाबाद आणि १ बाधित व्यक्ती सोलापूर येथे संदर्भित झाले आहेत. रविवार दिनांक २८ जून रोजी ७४ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- १ लाख ४६ हजार ५८३,
घेतलेले स्वॅब – ६ हजार २०६,
निगेटिव्ह स्वॅब – ५ हजार ३९०,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या – १८,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती – ३६७,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या – १४,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या – ३,
मृत्यू संख्या – १६,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या – २७९,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती – ७२,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची ७४ एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
COMMENTS