शाळा प्रवेशासाठी पालकांची पिळवणूक करू नये - कास्ट्राइब

शाळा प्रवेशासाठी पालकांची पिळवणूक करू नये - कास्ट्राइब माजलगाव (प्रतिनिधी)  शैक्षणिक वर्ष सन 2020-21 या वर्षासाठी आर.टी.ई अंतर्गत 25% देण्या...

  • शाळा प्रवेशासाठी पालकांची पिळवणूक करू नये - कास्ट्राइब



माजलगाव (प्रतिनिधी) 


शैक्षणिक वर्ष सन 2020-21 या वर्षासाठी आर.टी.ई अंतर्गत 25% देण्यात येणाऱ्या शाळा प्रवेशा बरोबरच अनुदानित/विनाअनुदानीत प्रशालेत कोणत्याही पालकांकडून सद्यस्थितीत व भविष्यातही आवाजवी शाळा प्रवेश शुल्क आकारणी करून पालकांची पिळवणूक करू नये व या प्रक्रियेत दोषी आढळणाऱ्या शैक्षणिक संस्थेविरुद्ध कडक कार्यवाही करण्याची मागणी सामाजिक बांधीलकी या भावनेतून कास्ट्राइबने निवेदन व प्रसिध्दी पत्रकान्वये केली आहे


सन2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी आर.टी.ई.कायदा2009 मधील कलम(12 )(1 ) सी नुसार खाजगी विनाअनुदानीत/ कायम विनाअनुदानीत/ स्वंयअर्थसहाय्यित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर25% जागा वंचित दुर्बल घटकांसाठीच्या मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतुद आहे.


उपरोक्त शैक्षणिक वर्षासाठी25% प्रवेशाबाबत ऑनलाईन अर्ज मागवून दि.17.06.2020 रोजी लॉटरी काढण्यात आली असून,त्यानुसार विद्यार्थाची शाळांनिहाय निवड झाली आहे.शाळांनी आपल्या स्तरावर कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी करून व संकलन करून, पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश देणे आवश्यक आहे.या सर्व प्रक्रियेत शाळांनी पात्र विद्यार्थी पालंकास याची परीपूर्ण कल्पना देण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवणे, तसेच प्रवेश वेळापत्रकाची माहिती त्यास देणे,त्याच्याकडून हमीपत्र लिहून घेताना अधिकची सक्ती लादण्यास प्रतिबंध करणे,जर काहि पालक स्थलांतरीत असतील तर त्यांस पुढची तारीख देणे,अन्यथा दिलेल्या तारखेस जर पालक उपस्थीत राहिला नाही हे कारण दाखवून त्यास प्रवेशापासून वंचित ठेवल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.कागदपत्राच्या पुर्तते अभावी एखादयास प्रवेश नकारला जावू नये याकड जाणीवपूर्वक गटशिक्षणाधिकारी यांनी लक्ष देणे अत्यंत आवश्यक असल्याचे म्हटले आहे.तसेच कार्यालयाकडून नियुक्त शाळा प्रवेश कमिटीने पालकांच्या अडिअडचणी, प्रश्न,रामस्या यांची सोडवणूक करावी तसेच कोवीड19 ची सद्यस्थीती लक्षात घेता पालकास या सर्व प्रक्रियेत कागदपत्रांची पुर्तता करणेस तसेच प्रत्यक्ष उपस्थीत राहणेस अनेक आडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे त्याच्या पाल्याचा प्रवेश नाकारू नये.


अनेक शैक्षणिक संस्था शिक्षणाच्या पवित्र कार्यातूनही पैशा कमवणाच्या उद्देशाने शाळा प्रवेशास आवाजवी शुल्क आकारत असून पालकांची पिळवणूक करत आहेत ती त्या संस्थांनी थांबवावी. जर कोणत्याहि पालकास या प्रकरणात संघटनेची मदत हवी असल्यास त्यांनी पदाधीकाऱ्यांशी संपर्क साधावा असे अवाहन प्रसिद्धी पत्रकान्वये


भारत टाकणखार,


वसंत टाकणखार यांनी केले आहे.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group