- *उद्योगपती काकानी यांना विधान परिषदेवर घेण्याची धर्माबाद कुल जमाती तहरिकची मागणी.*
धर्माबाद येथील उद्योगपती श्री सुबोध सेठ काकानी यांना माननीय राज्यपाल कोठ्यातील साहित्य, कला, विज्ञान,सहकार व सामाजिक सेवा या क्षेत्रात अनेक उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला आपल्या कोट्यातून आमदारकी पद देऊन निवड करावी.मागील काही दिवसापूर्वी लॉकडाउनच्या काळात 32 दिवसाचे हजारों व्यक्तींना प्रत्येक जातीच्या लोकांना अन्नदान केले आहे तसेच अनेक उपक्रम समाजापुढे राबविले आहे. असेच अनेक उपक्रमामध्ये त्यांचा नेहमी भरीव सहभाग असतो. महणून आम्ही सर्व मुस्लिम समाजातर्फे कुल जमाती तहरिकच्या वतीने श्री सुबोध सेठ काकांनी यांचा विधान परिषदेवर घेण्याची मागणी करीत आहोत.धर्माबाद तालुक्याच्या व नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक व्यक्तींची निवड करून कोणत्याही राजकीय चौकटीत न राहता सदैव सर्वांसाठी आपण हे तत्त्व घेवुन कार्यरत असणाऱ्या सुबोध ओमप्रकाश काकांनी यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य महणुन सेवेची संधी द्यावी.असे निवेदन मुस्लिम समाजाच्या वतीने कुल जमाती ताहरिकच्या वतीने आज माननीय उपजिल्हाधिकारी श्री राजेन्द्र शेळके यांना देण्यात आले. यावेळी हाफिझ शेख इम्तियाज (अध्यक्ष), हाफिझ अब्दुल गफार(सचिव), हाजी सैय्यद अल्ताफ अली (संघटक), मोहम्मद आरिफ,सैय्यद साजिद,नविद अहमद,शेख राझ्झाक,अब्दुल मतीन, आमेर खान,शेख युनूस,अहमद लड्डा,सैय्यद सैलानी,शेख सद्दाम आणि मोहम्मद मुबशिर ईत्यादी उपस्थित होते.
-ग्लोगल मराठवाडा न्युजसाठी - अहमद लड्डा, धर्माबाद.
COMMENTS