- शिक्षक संघटनेच्या माद्यमातून सुर्वे यांनी शिक्षकांची अनेक प्रश्न सोडवले -डि. के. देशपांडे
सेलू (किशोर कटारे )
सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या नूतन विद्यालयात उपमुख्याध्यापक म्हणून असलेले मा. मा. सुर्वे यांची आज दि. 30 जून 2020 रोजी सेवनिवृत्ती प्रसंगी त्यांचा सेवागौरव समारंभाचे आयोजन नूतन विद्यालयात करण्यात आले होते.या वेळी बोलताना संस्थेचे सचिव डि. के. देशपांडे यांनी सुर्वे यांच्या बद्दल बोलताना म्हणाले की संघटनेच्या माद्यमातून सुर्वे यांनी शिक्षकांची अनेक प्रश्न सोडवले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नूतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया यांची उपस्थिती होती.
या वेळी व्यासपीठावर नूतन शिक्षण संसथेचे सचिव डी. के. देशपांडे, सहसचिव डॉ. व्ही. के. कोठेकर, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, मा. मा. सुर्वे आणि सुर्वे वहिनी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी यांनी केले तर स्वागतगीत संगीत शिक्षक सच्चीदानंद डाखोरे यांनी मंजुळ आवाजात गायले. या वेळी नारायण सोळंके यांनी सुर्वे सर यांच्या विषयी आपले मत मांडले.भ्रमणधवनी वर त्यांची मुलगी सारिका सुर्वे (चौखट )यांनी भावनिक कवितेतून आपल्या वडिलांचे कौतुक केले. या नंतर शाळेचे पर्यवेक्षक रामकिशन मखमले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.नूतन महाविद्यलायचे प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या वेळी संस्थेचे सहसचिव डॉ. व्ही. के. कोठेकर यांनी आपले विचार मांडताना सांगितले की मा. मा.सुर्वे माझे विद्यार्थी असून त्यांच्या चांगल्या कामाचा आनंद शिक्षक म्हणून मला वाटतो.संस्थेचे सचिव डि. के. देशपांडे यांनी आपले विचार मांडताना मा. मा. सुर्वे यांच्या स्वभाव बद्दल बोलताना त्यांनी सुर्वे मा मा. यांच्या शिक्षकांच्या संघटनेतील कामाच्या विविध पैलूवर प्रकाश टाकला. परंतु आता शिक्षक संघटना ह्या केवळ शिक्षकाच्या राहिल्या नसून त्यांना देखील राजकीय किनार आहेत. त्या मुळे शिक्षकाची कामे त्यांच्या मागण्या मार्गी लागण्यास अनेक अडथळे येत आहेत. असे मत व्यक्त केले. या वेळी सत्कारमूर्ती मा. मा. सुर्वे सर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मन्हाले की शाळेच्या कामात नेहमी तत्पर राहणे शाळेसाठी काम करणे यात मला फार आनंद मिळायचा.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष मालसटवाड यांनी केले. तर आभार शिक्षक प्रतिनिधी अनंतकुमार विश्वम्भर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी नंदकुमार बंगाळे , गणेश माळवे, फुलसिंग गावित, मोगल सर, हिवाळे, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, विरेश कडगे, आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमासाठी शाळेतील सहकारी शिक्षक, सुर्वे मा. मा. यांचा परिवार उपस्थित होता.
COMMENTS