- जुक्टा संघटनेची शिक्षण उपसंचालक भगवान सोनवणे यांच्या समवेत ऑनलाईन बैठक संपन्न !!
दि. 29.6.20 रोजी , ठिक दु.3 वाजता , जुक्टा संघटनेची ,लातूर, उस्मानाबाद , नादेंड, या तीन जिल्ह्याची विभागीय बैठक , शिक्षण उपसंचालक भगवानराव सोनवणे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली ,
त्यात संघटनेने , विद्यार्थी , पालक, शिक्षक यांच्या प्रश्नासंदर्भात व महाविदयालय सुरू करण्याबाबतच्या चर्चा घडवून आणली , या बैठकीला प्रमुख उपस्थीती , शिक्षणाधिकारी औंदुबर उकीरडे लातूर ,शिक्षणाधिकारी गजानन सुसर उस्मानाबाद , शिक्षणाधिकारी बी.आर. कुंडगीर , व जुक्टा महासंघाचे राज्यउपाध्यक्ष प्रा.विलासराव जाधव , यांची प्रमुख उपस्थीती होती ,
पदाधिकारी यांनी झुम अॅप ऑनलाईन चर्चेत काही प्रश्न उपस्थीत केले त्यात, महासंघाचे उपाध्यक्ष प्रा.विलासराव जाधव यांनी .२ मे २०१२ नंतर एन.ओ.सी. दिलेल्या शिक्षकांना वैयक्तीक मान्यता देण्यासाठी कॅम्प लावावा , व पेन्शन प्रस्ताव डी.वाय.डी. अधीकारात च ठेवावे असे प्रश्न मांडले यावर शिक्षण उपसंचालक यांनी , वैयक्तीक मान्यता एनओसी दिलेले सर्व प्रस्ताव निकाली काढू म्हणाले , पेन्शन प्रस्ताव शिक्षणाधिकारी मार्फत आले तर परत त्रुटी राहणार नाहीत , असेही समाधान कारक उत्तर दिले ,
जुक्टा उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश ननवरे यांनी विभागातील उमावि/ कमवि सुरू करणे बाबत मार्गदर्शन करावे , व नविन पूर्नरचीत अभ्यासक्रमावर ऑनलाईन प्रशिक्षण घेणे बाबत प्रश्न उपस्थीत केला , यावर शिक्षण उपसंचालक यांनी शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई परिपत्रक दि .१५ जून 202O च्या निर्णयानुसार ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्यानुसार महाविद्यालयानी वर्ग इ.१२ चे सुरु करावेत , व नविन अभ्यासक्रम प्रशिक्षण ऑनलाईन घेणे बाबत शासनास पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगीतले ,
लातूर जुक्टा जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराम सूर्यवंशी यांनी , विद्यार्थी सुरक्षा, शिक्षक सुरक्षा , प्रश्न व अडीअडचणी बाबतचे प्रश्न व वरीष्ठ व निवडश्रेणीचे प्रस्ताव निकाली काढणे बाबत व पुर्वी वैयक्तीक मान्यता असेल तर विनाअट सेवा सातत्य दयावे असे प्रश्न उपस्थित केले , असता
यावर शिक्षण उपसंचालक यांनी शासनाचे १५ जुन २० चे परिपत्रक प्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीने कामकाज करावे म्हटले , तसेच वरिष्ठ व निवड श्रेणीचे दाखल प्रस्ताव निकाली काढणार म्हणाले , जे सेवासातत्य प्रस्ताव कार्यालयात सादर आहेत , तेही तांत्काळ देऊ असेही ते म्हणाले ,
नादेंड जुक्टा जिल्हाध्यक्ष प्रा. प्रभाकर पवार यांनी काही जिल्ह्यात १५ जुन पासून शिक्षकांची उपस्थीती महाविदयालयात सक्तीची केली आहे यावर मार्गदर्शन व्हावे असाही प्रश्न उपस्थीत केला यावर , शिक्षण उपसंचालक यांनी १५ जुन २० च्या परिपत्रकानुसार शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे , त्यानुसार व त्या त्या जिल्हाधिकारी साहेब यांचे आदेश व त्यानुसार अमलबजावणी करावी असेही म्हणाले ,
उस्मानाबाद जुक्टा सचिव प्रा. प्रशांत भागवत यानी , व्यपगत पदे कार्यान्वीत करुन पूर्नजीवीत करावेत असा प्रश्न उपस्थीत केला , व कार्याध्यक्ष प्रा. संजय भंडारे यांनी वाढीव पदांना मान्यता दयावी असेही प्रश्न उपस्थीत केले
यावर शिक्षण उपसंचालक यानी शासनाचे आदेश प्राप्त होताच कार्यवाही करू म्हणाले ,
लातूर जुक्टाचे सचिव प्रा. बाळासाहेब बचाटे यांनी , विद्यार्थी नुकसान टाळण्यासाठी रिक्त शिक्षकांच्या जागा भरणे व सन २०१९ -२० च्या संचमान्यता करावी कि नाही याचा संभ्रम दूर करावा, असे प्रश्न उपस्थीत केले
यावर शिक्षण उपसंचाक यांनी शासन निर्णय पद भरतीचा प्राप्त होताच , निर्णय घेऊ , व संचमान्यता २०१९ -२० सर्व महाविद्यालयानी करणे अनिवार्य आहे , नंतर शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत , सर्वानी संच मान्यता टप्याटप्याने करू घ्यावी असेही ते म्हणाले ,
लातूर जुक्टा जिल्हा उपाध्यक्ष चे प्रा.मारूती सूर्यवंशी यांनी ,विनाअनुदानीत शिक्षकांच्या प्रलंबित वैयक्तिक मान्यता कॅम्प लावुन दयाव्यात असा प्रश्न उपस्थीत केला असता , यावर शिक्षण उपसंचालक यांनी तांत्काळ दाखल प्रस्ताव निकाली काढणार असल्याचे म्हणाले ,
या बैठकीला शिक्षणाधिकारी श्री.औंदुबर उकिरडे , श्री गजानन सुसर , श्री .बी.आर.कुंडगीर यानीही मार्गदर्शन केले , शिक्षण उपसंचालक भगवानराव सोनवणे यांनी सकारात्मक उत्तरे देऊन व निर्णय घेण्याचे शिक्षकांच्या , विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ठोस आश्ववासन दिले खेळीमेळीत ऑनलाइन मिटींग संपन्न झाली , सुत्रसंचलन , प्रा.मारूती सूर्यवंशी ,यांनी केले तर
आभार सचिव प्रा. बाळासाहेब बचाटे यांनी मांडले ,
COMMENTS