ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य लीलाताई पाटील यांचे निधन
काेल्हापुर
सोमवारी रात्री ८.५० वाजता निधन झाले, त्या ९२ वर्षांच्या होत्या. कोल्हापूरातील पल्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री १० वाजता त्यांच्या राहत्या घरुन अंत्ययात्रा निघणार आहे. यांचा विवाह कोल्हापूरातील बापूसाहेब पाटील यांच्याशी झाला होता. पाटील यांचे काही वर्षापूर्वी निधन झाले तर त्यांचा मुलगा अपघाती मृत्यू पावला.
येथील ‘आंतरभारती'च्या साहाय्याने शिक्षणास सर्जनात्मक व आनंददायी बनवण्यासाठी ‘सृजन आनंद विद्यालय' नावाची इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतचे शिक्षण (केवळ औपचारिक नव्हे) देणारी एक शाळा त्यांनी सुरू केली.
लीलाताईंची पुस्तके ही शिक्षक माणूस घडवणारे उत्तम माध्यम आहे. विशेषत: मराठी अध्यापन हा लीलाताईंचा जीव की प्राण होता. त्यात त्यांनी अनेक प्रयोग करून पाहिले. 'सृआवि'त अशा प्रायोगांना लिखित रूप देण्यात आले आहे.
ग्लोबल मराठवाडा च्या वतीने
भावपूर्ण श्रद्धांजली!🙏🙏🙏
COMMENTS