*लातूरात आणखी 7 पॉझिटिव्ह* लातूर प्रतिनिधी सोमवारचा दिवस लातूर जिल्ह्यासाठी चिंता वाढविणारा दिवस ठरला असून दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यु...
*लातूरात आणखी 7 पॉझिटिव्ह*
लातूर प्रतिनिधी
सोमवारचा दिवस लातूर जिल्ह्यासाठी चिंता वाढविणारा दिवस ठरला असून दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यु झालेला असतानाच जिल्ह्यात 7 रुग्ण नव्याने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेत सोमवारी एकूण 73 जणांचे स्वॅब तपासण्यात आले. यातील 58 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील एक रुग्ण बाभळगाव येथील असून उर्वरित सहा रुग्ण उदगीर शहरातील हनुमान नगर (सिग्नल नं.2) भागातील आहेत.
उदगीर शहरात आज पर्यंत एकूण 91 कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेली आहेत. यापैकी चार रुग्णांचा मृत्यू यापूर्वीच झालेला असून सोमवारी उदगीरात पाचवा बळी गेला आहे. आता येथील कोविड रुग्णालयात एकूण 18 कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत.
COMMENTS