*मिशन आयएएसच्या सुपर ६० उपक्रमास उदंड प्रतिसाद*

आयएएस सारख्या भारतातील सर्वोच्च परीक्षेचे प्रशिक्षण दुसऱ्या वर्गापासून देणाऱ्या महाराष्ट्रातील मिशन आयएएस या संस्थेच्या सुपर ६०या उपक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून सकारात्मक प्रतिसाद प्राप्त झाला आहे . उपक्रमासाठी आलेल्या अर्जामधून फक्त ६० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे . दि ५ जूनपासून या सुपर ६० अभ्यासक्रमाला प्रारंभ झाला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण वर्षभर चालणार आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे लक्ष गाठेपर्यंत सातत्याने या क्षेत्रातील आयएएस ,आयपीएस व राजपत्रित अधिकारी तसेच तज्ञ मान्यवरांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. या उपक्रमासाठी १४ ते २०हा वयोगट ठेवण्यात आला असून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी, त्यांना तत्पर ,तेजस्वी व करण्यासाठी मिशन आयएएस जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे . या उपक्रमात दर रविवारी विविध अधिकारी मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत . दिनांक १७ जूनला या उपक्रमामध्ये पश्चिम बंगालमधील आयपीएस अधिकारी श्री विशाल नरवाडे यांनी आणि दिनांक १४ जून रोजी अमरावतीच्या एस आर पी एफ चे समादेशक श्री लोहित मतानी, आयपीएस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे .या रविवार दिनांक 21 जून रोजी आयएएस अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानाईत, मुंबईचे आयपीएस अधिकारी श्री कैसर खालीद व अमरावतीचे उपायुक्त तसे अपर जिल्हाधिकारी श्री संजय पवार यांना निमंत्रित करण्यात आले आहे. आतापर्यंत जवळपास २०० आय ए एस,आय पी एस, अन्य अधिकारी, विविध मान्यवरांनी मिशन आयएएसच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. मिशनच्या विविध उपक्रमांची माहिती iasmission .org या संकेत स्थळावर उपलब्ध आहे . हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मिशनचे संचालक प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे , सहसंचालक प्रा प्रवीण खांडवे , दिल्लीच्या मालूका आयएएसचे श्री लक्ष्मण मालुका, मिशनचे राज्य समन्वयक मुंबईचे श्री देवेंद्र भुजबळ , महिला समन्वयक प्रा पल्लवी एरुळकर ,जूनियर आयएएसचे समन्वयक श्री प्रवीण गुल्हाने व जनसंपर्क अधिकारी श्री रविंद्र दांडगे कार्यरत आहेत . महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून अनेक मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.


टिप्पण्या