नित्रुड व शु.ति.लिमगाव येथील शेतकऱ्यांना बळीराजा कर्ज योजने अंतर्गत प्रत्येकी ३०,०००/ कर्ज वाटप
माजलगाव ( प्रतिनिधी ) येथील संघमित्रा अर्बनचे चेअरमन सुभाषजी घनघाव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत संघमित्रा अर्बनने खरीप हंगामाच्या तोंडावर आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवाना रसायनिक खते व बि-बियाणे खरेदीसाठी बळीराजा कर्ज योजना अंतर्गत नित्रुड व शु.लिमगाव येथील शेतकर्यांना प्रत्येकी ३०,०००/ रुपये कर्ज वाटप करण्यात आल्याने कोरोना महामारीच्या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र शासनाने माहत्म फुले योजने अंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतचे पिक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतल्याने ज्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ होऊनही कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पिक कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत राष्ट्रीयकुत बँकांनी नवीन पिक कर्ज वाटप न झाल्याने खरीप हंगामाच्या तोंडावर आर्थिक संकाटात सापडलेल्या शेतकऱ्यांना रसायनिक खते व बि-बियाणे खरेदी करण्यासाठी संघमित्रा आर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष घनघाव यांच्या वाढदिवसानिमित्त संचालक मंडळाने दि ०१ जुन सोमवार रोजी बळीराजा कर्ज योजने अंतर्गत शु.ति.लिमगाव येथील पाच शेतकरी व नित्रूड येथील पाच शेतकऱ्यांना प्रत्येकी ३०,०००/रुपये कर्ज दिल्याने, कोरोना महामारीच्या संकटात खरीप हंगामाच्या तोंडावर आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
COMMENTS