*उपजिल्हा रुग्णालयात आता सामान्य रुग्णच भरती, कोरोना बाधित रुग्णाची इतरस्त सुविधा*
सेलू (किशोर कटारे )
सेलू उपजिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्ण ठेवल्यामुळे त्याचा परिणाम इतर रुग्णसेवेवर होत असल्याने कोरोना बाधित रुग्णाची इतरस्त्र व्यवस्था करून उपजिल्हा रुग्णालयात सामान्य रुग्णांना कोणतीही भीती वाटणार नाही याची काळजी घेतल्याने सामान्य रुग्णाची काळजी मिटली आहे.
कोरोना चे रुग्ण उप जिल्हा रुग्णालयात
ठेवले की इतर रुग्ण येण्यास भीत होते त्या मूळे रुग्णालयीन सेवेवर परिणाम होत होता, इतर रुग्णांना ही आवश्यक व उपलब्ध सेवा उप जिल्हा रुग्णालयात मिळावी त्या अनुषंगाने डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह येथे कोविड केअर सेन्टर चालू केले आहे,त्या मूळे कोविड बाधित रुग्णांना तिथेच भरती करून उपचार दिला जाणार आहे.तरी सर्व नागरिकांनी उप जिल्हा रुग्णालयात उपलब्ध मोफत आरोग्य सुविधाचा लाभ घ्यावा. असे आवाहन डॉ. संजय हरबडे वैद्यकीय अधीक्षक उप जिल्हा रुग्णालय सेलू यांनी केले आहे.
COMMENTS